नाशिक : प्रत्येक व्यक्तीला जीवनात अमुक एका गोष्टीची आवड असते, किंवा त्याबाबतचा एखादा छंद असतो. अनेकदा हा छंद असा काही बळावतो की, त्या व्यक्तीची ओळखही त्याच्या छंदामुळं किंवा आवडीमुळं तयार होते. सध्या असंच काहीसं घडत आहे नाशिकमधील एका गृहस्थांसोबत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या या गृहस्थांची चर्चा आहे त्यांच्याकडे असणाऱ्या अमाप सोऩ्याच्या दागिन्यांमुळे. हातात सोनं, गळ्यात सोनं इतकं असतानाच आता नाशिकमधील मकरंद साळी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी म्हणून थेट सोन्याचा मास्कही बनवून घेतला आहे. 


लहानपणी रामायण- महाभारत यांसारख्या मालिका टीव्हीवर पाहिल्या. त्यामध्ये दिसणाऱ्या देव-देवतांची सोन्याची आभूषणं पाहून आपणही अशी आभूषणं घालावीत अशी इच्छा झाली. बस्स.... तेव्हापासूनच ही आवड जोपासण्यासाठी म्हणून त्यांनी पावलं उचलण्यास सुरुवात केली. अगदी सुरुवातीला म्हणजेच १९८८ मध्ये ३ हजार रुपयांचा दर असताना साळी यांनी ७ ग्रॅम सोन्याची अंगठी बनवली होती. 


 


तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी जवळपास ८० तोळं सोनं खरेदी केलं. मकरंद साळी हे व्यवसायानं टेलर आहेत. रोज त्यांच्या अंगावर किमान ८० तोळं सोनं असतं. सोन्याची ही आवड इतरी की, त्यांनी २ लाख रुपये खर्च करत सोन्याचा मास्कही तयार करुन घेतला. नाशिकमध्ये मकरंद साळी हे गोल्डन टेलर या नावानं ओळखले जातात. त्यातच आता सोन्याचा मास्कर तयार करुन घेतल्यामुळं गोल्डन मास्कवाले टेलर अशी नवी ओळख त्यांना मिळाली आहे.