नवी मुंबई : water crisis in Navi Mumbai : आता शहरात आठवड्यातून एकवेळ पाणीकपात (Water reduction) करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर विभागवार नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता पाणीकपातीचे संकट शहवासीयांवर आहे. (water cut in Navi Mumbai, Municipal Corporations strenuous exercise for water)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात 20 सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. मात्र काही भागात विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने विभागवार आठवड्यातून एकवेळ संध्याकाळी पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी आजपासून ऐरोली भागातून सुरू होणार आहे.



नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून आणि एमआयम्डीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. मोरबेतून पाणीपुरवठा सुरळीत आहे. पण एमआयडीसीतून 80 दशलक्ष लीटरऐवजी 60 ते 62 दशलक्ष लीटर पुरवठा होत आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या विभागात पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे प्रत्येक भागात सुरळीत पाणी देण्यासाठी महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे.