पुणे : विदर्भ आणि कोकणात एकीकडे पावसाचं धुमशान सुरू आहे. तर मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही पाणीकपातीचं संकट ओढवलं आहे. पुणेकरांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही पाणीबाणीचं संकट आहे. पुण्यातील खडकवासला धरणसाखळीने आता तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये अवघा 3.57 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. 


त्यामुळे जून अखेरपर्यंत दमदार पाऊस न झाल्यास शहरावर यंदा पाणी संकट ओढावण्याची शक्यता बळावली आहे. पुणेकरांना पाणीकपातीला सामोरं जावं लागू शकतं. 


मुंबई आणि पुण्यात अजून म्हणावा तेवढा पाऊस झाला नाही. त्यामुळे जून अखेरपर्यंत जर पाऊस आला नाही तर मुंबई आणि पाठोपाठ पुण्यावरही पाण्याचं मोठं संकट ओढवण्याची शक्यता आहे.