पुणे : पुण्यातील पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर शहराला दिवसातून एकच वेळ पाणी मिळणार आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणा-या धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आलेले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे शहराला सध्या १३५० एमएलडी पाणी मिळते मात्र पाण्याची कमतरता लक्षात घेता शहराच्या पाण्यात कपात करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार दिवाळीनंतर शहराला ११५० एमएलडी इतकंच पाणी मिळणार आहे. 


शहराला मिळणा-या पाण्याचं नियोजन महापालिकेकडून करण्यात आलंय त्यानुसार पाणीपुरवठा करण्याचं वेळापत्रक तयार करण्यात आलं असून दिवाळीनंतर शहारात एकचवेळ पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणीटंचाईला सामोरं जावं लागणार नाही असा सत्ताधा-यांनी केलेला दावा फोल ठरणार आहे.