Nashik Water Cut News : धरणांचा जिल्हा म्हणून ज्या शहराची ओळख आहे अशा नाशिकवर पाणीकपाचं संकट आहे. हवामान विभागाने यंदा पावसाळा लांबण्याचं भाकित केल्यामुळे नाशिककरांवर ऐन उन्हाळ्यात पाणी कपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेकडून खबरदीराचा उपाय म्हणून पाणीकपात करणाचा विचार सुरु आहे. (water cut possibly in nashik from saturday 8 April 2023 water shortage crisis maharashtra news in marathi )


आज महत्त्वपूर्ण निर्णय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज पाणीपुरवठा विभागाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत शनिवारपासून म्हणजे 8 एप्रिल 2023 पासून पाणीकपात करण्याबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे. जून महिन्यात जर पाऊस आला नाही तर जुलैपर्यंतची परिस्थिती लक्षात घेता आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. 


धरणांची परिस्थिती


या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 64 टक्के पाणीसाठा उपलद्ब आहे. तर या शहराची रोजची गरज 540 एमएलडी पाणी इतकी आहे. ही गरज पाहता 31 जुलैपर्यंत शहराला पाणी पुरवठा करणे गरजेचं आहे. त्यात एप्रिल आणि मे महिन्यात तापमानात वाढ होणार असल्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन या दोन महिन्यात जलद गतीने होणार. 



पाण्याचं बाष्पीभवन, नाशिककरांची गरज आणि उशिरा पावसाचं आगमन लक्षात घेता. नाशिकमध्ये पाणीकपात करणे गरजेचं असल्याचं नाशिक महापालिका आणि नाशिक पाणीपुरवठा विभागाला गरजेचं वाटतं.