नाशिकमध्ये धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ
राज्यभराबरोबर नाशिक जिल्हा परिसरातही मान्सून परतला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी 51.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस पेठ तालुक्यात झाला आहे. तेथे 168 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल इगतपुरी तालुक्यात 145 मिलीमीटर त्रंबकेश्वर मध्ये 118 मिलीमीटर तर नाशिक तालुक्यात 63 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
नाशिक : राज्यभराबरोबर नाशिक जिल्हा परिसरातही मान्सून परतला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी 51.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस पेठ तालुक्यात झाला आहे. तेथे 168 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल इगतपुरी तालुक्यात 145 मिलीमीटर त्रंबकेश्वर मध्ये 118 मिलीमीटर तर नाशिक तालुक्यात 63 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
एका दिवसात जिल्ह्यातील धरण साठ्यात 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी 29 टाक्यावर असणारा जिल्ह्यातील पाणीसाठा शनिवारी 38 टक्यावर जाऊन पोहचला आहे. गंगापूर धरणात शुक्रवारी 52 टक्के पाणीसाठा होता त्यात वाढ होऊन तो 68 टक्क्यावर गेला आहे. दारणा 71 वरून 78 टक्के, कश्यपी 37 वरून 52टक्के आळंदी 36 वरून 41 टक्के भावली 65 वरून 77टक्के तर मुकणे धरणाच्या पाणी साठ्यात 12 वरून 20 टक्यांची वाढ झाली आहे. एकूण 23 प्रकल्पांपैकी बहुतेक धरणांना अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा असून येत्या काळात पाऊस कसा पडतो त्यावर बरचं काही अवलंबून आहे.