विष्णु बुर्गे / बीड : जिल्ह्यातील चिमुकलीची संघर्षकथा दाखवल्यानंतर प्रशासनाला  जाग आली. पाण्यासाठीच्या मुलीच्या संघर्षाची बातमी प्रसिद्ध होतात प्रशासन गतीमान झाले. अधिकारी गावात दाखल झालेत. परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर प्रशासनाच्या मदतीने रुई तांडा गावात बोरवेल गाडी पोहोचली. बोअरवेल पाडण्यास सुरुवातही झाली. यानंतर गावात पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मुलीची चर्चा सुरु झाली. तिचे कौतुक करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बीड जिल्ह्यातील चिमुकलीची संघर्षकथा दाखवल्यानंतर प्रशासनाला  प्रशासन जागे झाले आणि या गावांमध्ये थेट बोरवेलची गाडी पोहोचली. बीड जिल्ह्यातल्या रुई तांडा गावातील भीषण परिस्थिती 'झी२४तास' ने दाखवली होती. त्यानंतर प्रशासनाने या बातमीची दखल घेत आणि आज चिमुकलीचा संघर्ष पाहून याठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्याचा मोठा निर्णय घेतला,



यासाठी बोर मारण्यासाठीची जागा ठरवण्यात आली आणि बोरवेलची गाडी दाखल होत कामही सुरु झाले. गावातील लोक आनंदी आहेत, मात्र याचा सर्वात जास्त आनंद झाला आहे तो त्या चिमुकल्या स्नेहल. कारण आता तिलाही जीवघेणे रोज रोजची कसरत करावी लागणार नाही. तिने आणि गावकऱ्यांनी 'झी२४तास'चे खास आभार मानले आहेत. 'झी२४तास'मुळे आम्हाला आजचे दिवस पाहायला मिळत आहेत. गावात पाणी उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. अन्यथा गेले अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत नव्हती. ती आज 'झी२४तास'मुळे पूर्ण झाली आहे.