पुणे : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने भिडे पूलावरील वाहतूक थांबवली आहे. नदीपात्रात पाण्याच्य़ा पातळीत वाढ झाली आहे. वाहतुक इतर ठिकाणी वळवल्याने शहरात वाहतूक कोंडी झाली आहे. पुणे शहराला पाणीपुरठा करणाऱ्या चारही धरणांच्या परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे रविवारपासूनच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणातील पाणीसाठा ७१ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. खडकवासला धरणातून पाच हजार १३६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 


धरणांतील पाणीसाठा


टेमघर  ५८.२७ टक्के


वरसगाव ६५.०० टक्के


पानशेत  ७९.८४ टक्के


खडकवासला १०० टक्के