यवतमाळ येथे आठ दिवसातून एक दिवसच पाणीपुरवठा
शहराला पाणीपुरवठा करणा-या निळोणा प्रकल्पातील मृतसाठा संपत आला असून आठ दिवसातून एक दिवसच पाणीपुरवठा होईल.
यवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणा-या निळोणा प्रकल्पातील मृतसाठा संपत आला असून आठ दिवसातून एक दिवसच पाणीपुरवठा होईल.
निळोण्याच्या शुन्य टक्के पाणी साठा असून चापडोह धरणातही अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे यवतमाळकरांनो पाणी जपून वापरा असा सल्ला जीवन प्राधिकरणाने दिलाय. यवतमाळ शहराला निळोणा आणि चापडोह या दोन प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो.
निळोणा प्रकल्प गाळाने भरला असून मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा सुरू आहे. त्यामुळे शहरात गढुळ आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहराची संपूर्ण भिस्त चापडोह प्रकल्पाच्या पाण्यावर राहणार आहे. चापडोहमध्ये 25 टक्के पाणीसाठा असून दोन आठवडे पुरवले जाऊ शकते.
सध्या यवतमाळकरांना तीन दिवसाआड पाणी पुरविलं जातंय. पावसाळ्यात निळोणा धरण ओव्हरफ्लो होईपर्यंत यवतमाळकरांना पाणी काटकसरीने वापरावं.