महाराष्ट्रासह देशातील पहिले गोड्या पाण्यातील जलपर्यटन; कोयना जलाशयातील मुनावळे येथे लोकार्पण
सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशयातील मुनावळे येथे जलपर्यटन सुरु करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचे लोकार्पण झाले.
Satara Tourism : महाबळेश्वर, पाचगणी, कोयना अशी एकाहून एक पर्यटन केंद्र असणा-या सातारा जिल्ह्यात आता पर्यटनाचा वेगळा अनुभव मिळणार आहे. गोड्या पाण्यातील देशातील पहिले जलपर्यटन कोयना जलाशयातील मुनावळे येथे सुरु करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित यांचे लाकार्पण झाले.
कोयना धरणातील शिवसागर जलाशयात मुवाळे येथे जलपर्यटनाच्या प्रकल्पाचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. गोड्या पाण्यातील हा देशातला पहिलाच जल पर्यटन प्रकल्प आहे. याच्या उदघाटनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पामुळं स्थानिकांना कसा फायदा होईल हे सांगितलं. स्थानिक तरुणांना रोजगार तयार होणार असुन कामासाठी शहरात गेलेला स्थानिक माणुस या प्रकल्पामुळं परत येईल असं सांगुन महाबळेश्वर मध्ये येणा-या पर्यटकांना आता याचा दुहेरी लाभ होईल असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकल्पात पर्यावरणाचा सुद्धा विचार करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दुर्गम गावाला जोडणारा ब्रीज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दुर्गम गावाला जोडणारा ब्रीज बांधला जात आहे.. दरेगाव आणि कांदाटी खो-याला जोडणारा हा पूल असेल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हा पुल बांधला जाणार आहे. महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा ते अहिरे असा केबल स्टेड पुल असणार आहे..