सातारा : Weather Alert : पश्चिम महाराष्ट्रात देखील थंडीचा (Cold) कडाका वाढत चालला आहे. महाराष्ट्राचे मिनी काश्मिर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरचा (Mahabaleshwar) पारा तब्बल ६ अंशावर आल्याने महाबळेश्वरच्या अनेक भागात दवबिंदू गोठले आहेत.वेण्णा लेक आणि  लिंगमळा परिसरामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.वेण्णा लेक परिसरात बोटीच्या जेटीवर, गाड्यांच्या टापांवर देखील दवबिंदू गोठल्याचे पहायला मिळाले.या भागात पडलेल्या या गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक महाबळेश्वर मध्ये येऊ लागले आहेत.


धुळ्यात थंडीचा कडाका वाढला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळे (Dhule) जिल्ह्यात तापमानाची पुन्हा नीचांकी तापमानाची नोंद झालीय. धुळ्यात पारा ५.५ अंश सेल्सिअस इतका खाली गेला आहे. कृषी महाविद्यालयात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. थंडीचा कडाका वाढला असून जीवघेण्या गारठ्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय..संध्याकाळी सात वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत कडाक्याच्या थंडीच्या प्रकोपामुळे घराबाहेर पडणं नागरिकांना मुश्किल झाले. या थंडीचा फायदा हा रब्बी पिकांना होणार असला तरी सांधेदुखीचा त्रास असलेल्यांचा आजार मात्र प्रचंड बळावलाय...


सर्वाधिक नीच्चांकी तापमान


दरदिवशी परभणीच्या (Parbhani,) तापमानात घट होऊन थंडीत वाढ होऊ लागली आहे. आज परभणीचा पारा ५.१ अंश सेल्सिअस वर येऊन ठेपलाय, यंदाच्या हिवाळ्यातल सर्वाधिक नीच्चांकी तापमान आहे. दरदिवशी हे तापमान घसरत चालल्याने यंदा बोचऱ्या थंडीचा परभणीकरांना सामना करावा लागतोय, परभणीकरांना या थंडीचा सामना आणखीन काही दिवस करावा लागणार असल्याचा अंदाज परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने वर्तवला आहे. काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून बर्फवृष्टी होत असून त्यामुळे उत्तरकडून जे थंड वारा आपल्याकडे वाहून येतोय त्यामुळे परभणीच्या तापमानात मोठी घट होत आहे.