Weather Updates :मुंबईसह राज्यात पारा घसरल्यानं हुडहुडी, उत्तरेकडील थंडीच्या लाटेचा आणखी दोन दिवस परिणाम
Weather Forecast : मुंबईतलं तापमान 15.2 अंशावर घसरले आहे. उत्तरेकडची थंडीची लाट (cold wave) राज्याच्या दिशेनं येतेय. (Maharashtra Weather) त्याच्या परिणामामुळे मुंबई गारेगार झाली आहे. पुढचे दोन दिवस तापमानात आणखी घसरण होईल.
Weather Forecast Maharashtra : मुंबईसह राज्यात पारा घसरल्यानं कडाक्याची थंडी पडलीय. (Mumbai Weather) मुंबईतलं तापमान 15.2 अंशावर घसरले आहे. उत्तरेकडची थंडीची लाट (cold wave) राज्याच्या दिशेनं येतेय. (Maharashtra Weather) त्याच्या परिणामामुळे मुंबई गारेगार झाली आहे. पुढचे दोन दिवस तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यात आहे. ( Weather News in Marathi) उत्तर भारताच्या हिमालयाकडच्या भागांमध्ये हिमवृष्टीत वाढ झाली. (India Weather) तिथले शीत वारे दक्षिणेकडे वाहत असल्याने राज्यासह मुंबईचाही पारा घसरला आहे. पुढचे दोन दिवस मुंबईचं किमान तापमान 15 अंशाखाली राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईत सध्या गेले काही दिवस वातावरणात गारवा आहे. मुंबईत तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. या तापमानात 17 जानेवारीपर्यंत हे तापमान अधिक घसरणार असून पारा 13 अंशापर्यंत जाऊ शकतो. उत्तर भारतातील थंडीचा परिणाम हा मुंबईसह महाराष्ट्रात जाणवत आहे. मुंबईत हुडहुडी भरली आहे. उत्तरेत अजूनही बर्फवृष्टी होत असून हवामान खात्याने काही राज्यांत शीतलहर येणार असल्याचा इशारा दिला आहे. या शीतलहरींमुळे मुंबईसह कोकणात पुढील चार दिवसांत थंडी वाढेल, अशी शक्यता आहे.
मुंबई आणि उपनगरांत पारा घसरला
मुंबईसह कल्याण डोंबिवली या शहरांतील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे येथे थंडीची चांगलीच चाहुल लागली आहे. मुंबईचा पारा 15.2 वर खाली आला आहे. तर नवी मुंबईत 14.8 असून ठाणेचा पारा 14 आहे. सर्वाधिक कमी तापमान मुंबई उपनगर बदलापूर येथे आहे. येथे पारा 10.4 अंशावर असून कल्याण 12.4 आणि डोंबिवली 12.8 अंश नोंदविण्यात आला आहे.
रायगडकर सद्या गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत. पारा 11 ते 12 अंशापर्यंत खाली आला असून रोज सकाळी धुके पडते आहे. या वातावरणाचा फायदा रब्बी पिकांना होणार आहे. थंडीमुळे वाल, हरभरा, पावटा, तूर, मूग मटकी यासारखी कडधान्य पिके जोर धरतील असा अंदाज आहे. शिवाय आंब्याचा मोहर धरण्यास मदत होणार आहे.
निफाड येथे नीचांकी तापमानाची नोंद
राज्याच्या किमान तापमानात (Minimum Temperature) घट दिसून येत आहे. किमान तापमानात पुन्हा घट झाल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा (Clod Weather) वाढला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात थंडी (Cold) टिकून आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा कायम राहणार आहे. निफाड येथे नीचांकी 5.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, औरंगाबाद येथेही तापमानाचा पारा 10 अंशांपेक्षा खाली होता.
उत्तर भारतात थंडी कायम आहे. आज दिल्लीत कमाल तापमान 17 ते 18 अंश सेल्सिअस राहील. येत्या तीन दिवसांत थंडीची लाट वाढणार आहे. झारखंडसह दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब , हरियाणा , राजस्थान आणि बिहार येथे 16 ते 20 जानेवारी दरम्यान थंडीची लाट दिसून येईल. यादरम्यान अनेक भागात किमान तापमान 3 ते 6 अंश सेल्सिअसपर्यंत घसरून 3 अंशांपर्यंत पोहोचू शकते. दिल्लीत पुन्हा एकदा थंडी पडणार आहे.