कुठवर पोहोचलं Cyclone Mocha? Live Video च्या माध्यमातून पाहा कसं धारण करतंय रौद्र रुप
Cyclone Mocha Maharashtra Weather Updates : मोका चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही म्हणता म्हणता राज्यातील काही भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं आता नेमका कोणत्या भागाला हा इशारा देण्यात आला आहे ते नक्की पाहा.
Cyclone Mocha Maharashtra Weather Updates : मागील काही दिवसांपासून 10 मे 2023 रोजी देशात सर्वात पहिलं चक्रिवादळ येणार असल्याचा इशारा देण्यात येत होता. अखेर तो दिवस उजाडला आणि या वादळाचं नेमकं रुप दिसण्यास सुरुवात झाली. अंदमानच्या समुद्रात दक्षिणेकडे बंगालच्या उपसागराच्या पट्ट्यात बुधवार (आज) मोका चक्रिवादळ उत्तर अंदमानच्या दिशेनं पुढे सरकणार आहे. ज्यामुळं संपूर्ण देशाच्या हवामानावर याचे कमीजास्त परिणाम होताना दिसणार आहेत.
10 मे पासून चक्रिवाद रौद्र रुप धारण करण्यास सुरुवात करेल आणि 12 ते 14 मे पर्यंत त्याचा प्रवास सुरु राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 12 मे पर्यंत हे वादळ उत्तर पश्चिम दिशेला पुढे सरकणार आहे. जिथं ते अतीरौद्र रुप धारण करताना दिसेल. परिणामी ओडिशाचा उत्तर भाग आणि पश्चिम बंगालचा किनारपट्टी भाग प्रभावित होणार असून, या भागात मुसळधार ते अतीमुसळधार पावसासोबतच सोसाट्याचे वारे वाहणार असल्याचाही इशारा देण्याच आला आहे.
हेसुद्धा वाचा : आज निघणार MHADA ची सोडत; 4650 जणांना मिळणार हक्काचं घर, जाणून घ्या A to Z माहिती
वादळाची तीव्रता पाहता समुद्रही खवळलेला असेल, त्यामुळं मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय लहान जहाजंसुद्धा किनाऱ्यावर आणण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रावर काय परिणाम?
इथं महाराष्ट्रापासून वादळ बरंच दूर असलं तरीही राज्यावर नाही म्हणता त्याचे परिणाम गिसून येणार आहेत. ज्यामुळं विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गोंदिया, गडचिरोलीलाही अवकाळीचा तडाखा बसणार आहे. 11 मे पर्यंत बंगालच्या उपसागरात उत्तर वायव्येकडून चक्रीवादळ पुढे सरकेल यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी 120 किमी इतका असेल. त्यामुळं राज्याच्या किनारपट्टी भागातही सोसाट्याचा वारा आणि खवळलेला समुद्र अशीच परिस्थिती पाहायला मिळू शकते.