Weather Update : उफ्फ् ये गर्मी! फेब्रुवारीतच उन्हाने शरीराची होत आहे लाहीलाही, पुढे काय होणार?
Weather Forecast : फेब्रुवारीतच उन्हाने शरीराची लाहीलाही होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. आताच हे हाल असल्यास उन्हाळ्यात काय होणार अशी चिंता सगळ्यांना पडली आहे. अशातच IMD कडून इशारा देण्यात आला आहे.
Weather Update in marathi : गेल्या दोन दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. फेब्रुवारी महिना असून गरमीमुळे अंगाची लाहीलाही होतं आहे. महाराष्ट्र (Maharashtra Weather) गोवा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये Heat wave आला आहे. बहुतांश भागात कमाल तापमान 37 ते 39 अंशावर गेलं आहे. फेब्रुवारीचे हवामान आल्हाददायक होण्याऐवजी अधिकच उष्ण (Heat) होत आहे. अशा स्थितीत हवामान खात्याने (IMD) पुढील दोन दिवस अधिक त्रासदायक असल्याचं सांगितलं आहे. तर सुमद्राची वारे उशिराने वाहू लागल्यामुळे मुंबईतील (Mumbai News) कमाल तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना उन्हाचा छळा बसणार आहेत.
उन्हाळ्याची चाहूल!
महाराष्ट्रातील (Maharashtra Temprature) तापमानात वाढ होणार आहे. याचा अर्थ फेब्रुवारी महिन्या संपण्यापूर्वीच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मुंबईतून थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. मुंबईत कालच्या तुलनेत 7.6 अंशांनी तापमान वाढलं आहे. (Weather Update maharashtra weather update temperature rise IMD heat wave Alert in marathi)
देशभरातील हवामान कसे असेल?
देशभरातील हवामानाबद्दल बोलायचं झालं तर, फेब्रुवारी महिन्यातच देशात मे महिन्यातील उष्मा कोसळणार आहे. रविवारी 19 फेब्रुवारी ते बुधवार 22 फेब्रुवारी दरम्यान, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेशमध्ये तापमान 40 अंशांच्या आसपास असेल. तर पंजाब, हरियाणा, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड इत्यादी ठिकाणी तापमान 31 ते 36 अंशांच्या आसपास राहू शकते. तर 20 आणि 21 फेब्रुवारीला तापमान सर्वाधिक असू शकतं.
त्याचप्रमाणे देशाच्या अनेक भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा 6 ते 12 अंशांनी जास्त असू शकतं. त्याचबरोबर यंदा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये उष्मा अधिक असेल, असेही हवामान तज्ज्ञांचं म्हणणंय. हे दोन्ही महिने उन्हाळ्यातील रेकॉर्ड ब्रेकर ठरू शकतात.
उन्हाळ्यात अशी घ्या काळजी
उकाड्यापासून वाचण्यासाठी पाण्याची बाटली जवळ बाळगा.
उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या.
लिंबू पाणी, ज्यूस, सरबत प्या.
उन्हाळ्यात कॉटनचे कपडे घाला.
छत्री सोबत ठेवा.