कल्याण : कल्याणमधील आधारवाडीत पहिला शेतकरी आठवडा बाजार सुरू झालाय. शेतक-यांचा माल शेतातून थेट ग्राहकांना उपलब्ध व्हावा यासाठी सरकारतर्फे ही योजन अमलात आणली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते या शेतकरी आठवडी बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. मुसळधार पावसात पहिल्याच दिवशी कल्याणकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्यामुळे सुमारे आठ टन भाजीपाल्याची विक्री झाली. 


शेतक-यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच ग्राहकांना माफक दरात भाजीपाला आणि फळं उपलब्ध व्हावीत यासाठी राज्यात शेतकरी बाजार सुरू करण्यात आलेत.