नातेवाईकाच्या घरी गेला आणि इमारतीच्या 24 व्या मजल्यावरून खाली पडला; ठाण्यातील धक्कादायक घटना
मृत व्यक्ती हा ठाण्यात आपल्या नातेवाईकाकडे आला होता. अचानक 24 मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे.
Thane News : नातेवाईकाच्या घरी गेलेला एक तरुण इमारतीच्या 24 व्या मजल्यावरून खाली पडला आहे. ठाण्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून ही घटना नेमकी कशी घडली याचा तपास करत आहेत. मात्र, हा तरुण तोल जाऊन पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे (Thane News).
काय घडलं नेमक?
ठाण्यातील पाचपखाडी मधील आनंद सावली बिल्डींग मध्ये हा प्रकार घडला आहे. 24 व्या मजल्या वरुन पडून एका व्यक्ती चा दुर्देवी मुत्यु झाल्याची घटना घडली आहे. तो येथे आपल्या नातेवाईकांच्या घरी आला होता. या तरुणाचे नाव काय आहे? तो आनंद सावली बिल्डींग मध्ये कोणाकडे आला होता? याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही.
शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. नातेवाईकांच्या घरी आलेल्या एका व्यक्तीचा मुत्यु झाल्याने एकच खळबळ माजली. हा तरुण 24 व्या मजल्यावरुन पडल्यावर सोसायटी मध्ये आणि बाहेर बघ्यांची ची गर्दी झाली होती. हा अपघात आहे की घातपात याबाबत आता पोलीस शोध घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिस घटना स्थळी दाखल झाले असून पोलिसानी पुढील तपास सुरू केला आहे.
सातव्या मजल्यावरुन पडून साडे तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू
वसईमध्ये इमारतीवरुन पडून चिमुकलीचा मृत्यू झाला होता. सातव्या मजल्यावरुन पडून साडे तीन वर्षांच्या श्रेया महाजनचा मृत्यू झाला होता. वसई पश्चिममधल्या अग्रवाल कॉम्प्लेक्समधल्या रेजन्सी व्हीला या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून श्रेया खाली पडली. तिची आई बहिणीला शाळेत सोडण्यासाठी गेली होती. त्यावेळी श्रेया घरात एकटी होती. मोबाईलवर खेळता खेळता ती बाल्कनीमध्ये आली होती. तिच्या हातातला मोबाईल खाली पडला. त्यामुळे ती ग्रीलवर चढली आणि तोल गेल्यानं तिचा मृत्यू झाला.
ससून रुग्णालयात एमबीबीएस विद्यार्थिनीचीं आत्महत्या
पुण्यात ससून रुग्णालयात एमबीबीएस विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. परीक्षेचा अभ्यास न झाल्यानं नैराश्यातून इमारतीवरुन उडी घेतल्याचे समजते.