पुण्यात `राफेल` नावाच्या शर्यतीच्या बैलाला `फॉर्च्युनर`चा भाव
अनेक बैलगाडा घाट गाजवणारा एका बैल (Rafel Bull) खरोखरच लाखमोलाचा ठरला आहे.
हेमंत चापुडे, झी २४ तास, जुन्नर : बैलगाडा शर्यती पुन्हा (bull cart race) सुरू झाल्यानं बैलगाडा मालकांना सुगीचे दिवस आलेत. अनेक बैलगाडा घाट गाजवणारा एका बैल खरोखरच लाखमोलाचा ठरला आहे. बैलबाजारात त्याला किती किंमत मिळाली, हे पाहिलंत तर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. (westran maharashtra pune wada bull market rafel bull buying by 19 lakh 41 thousand rupees)
बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा 'भिर्रर्रर्र'चा नाद घुमू लागलाय. गावागावात, जत्रा-यात्रांमध्ये बैलगाडा शर्यतींचा धुरळा उडतोय. त्यामुळे शर्यतीसाठी वापरल्या जाणा-या खिलार बैलांनाही लाखाचं मोल आलंय. पुणे जिल्ह्यातल्या वाडा इथं भरलेल्या बैल बाजारातला राफेल नावाचा बैल असाच लक्षवेधी ठरला.
सिद्धार्थ भंडारे आणि अक्षय मुळूक या दोघा तरुणांनी पाच वर्षांपूर्वी त्याला विकत घेतलं. म्हैसूर जातीच्या या बैलानं आतापर्यंत अनेक बैलगाडा घाट गाजवलेत. वाऱ्याच्या वेगानं धावणारा चपळदार राफेल. डौलदार शरीरयष्टी आणि रुबाबदार चाल असलेला राफेल. चिखली इथले बैलगाडा मालक संकेत आहेर यांनी राफेलसाठी तब्बल 19 लाख 41 हजार रुपये मोजलेत.
राज्यातील बैल बाजारांमध्ये अशीच स्थिती आहे. बैलगाडा शर्यत शौकिनांची पावलं बाजारकडे वळली असून लाखोंची उलाढाल सुरू झाली आहे. त्यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळतोय.