मुंबई : देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढत चाललाय. या दरम्यान कोरोना रुग्णसंख्येतही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. राज्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. ज्या वैद्यकीय महाविद्यालयात उद्याचे भावी डॉक्टर तयार होत आहेत, तेच भावी डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. (westren maharashtra Sangli 31 mbbs students of miraj Medical College  tested corona positive) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगलीतील वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या 31 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 


दोन लस घेतल्यानंतरही बाधा


महाविद्यालयातील 60 विद्यार्थ्यांचा स्वॅब पाठवण्यात आला होता. यापैकी 31 जण पॉझिटिव्ह आढळले. धक्कादायक आणि काहीशी चिंताजनक बाब अशी की, पॉझिटिव्ह आलेले या 31 विद्यार्थ्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. राज्यात कोरोनशिवाय ओमायक्रॉनचा प्रसारही वेगात होतोय. 


विद्यार्थ्यांची प्रकृती कशी आहे? 


"पॉझिटिव्ह आढळलेले विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणं नाहीत. त्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. खबरदारी म्हणून आमच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील रुग्णालयातच दाखल करण्यात आले आहे", अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुधीर नानंदकर यांनी दिली.