PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने (lokmanya tilak national award) सन्मानित करण्यात आले आहे. पुण्यात (Pune News) या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी समस्त पुणेकरांचं आणि महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात श्री गणेशाचे पूजन करून केली जाते, त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी पायाभरणी आणि उद्घाटन करण्यापूर्वी महाराष्ट्रातील पुणे येथील दगडूशेठ गणपती मंदिरात प्रार्थना करुन केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे दगडूशेठ हलवाई गणपतीच्या (Dagdusheth Halwai Ganapati) ठिकाणी जवळपास 20 मिनिटे होते. याठिकाणी त्यांनी अभिषेक करत आरती केली. त्यानंतर पंतप्रधना नरेंद्र मोदी यांनी गणपतीचे दर्शन घेऊन साकडं घातलं आहे. सिंधूताई सकपाळ यांच्या कन्या ममता सकपाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे औक्षण केले. यावेळी भारताने सोडलेलं चांद्रयान चंद्रावर 21 ऑगस्ट रोजी व्यवस्थितपणे उतरण्याचा असा संकल्प भारतीयांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.


"देवतांप्रती त्यांची अपार श्रद्धा आहे. ट्रस्टच्या वतीने पंतप्रधानांना चांदीचा गणपती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची माहिती त्यांना दिली. यासाठी महिनाभर आधीपासून तयारी सुरु होती. पंतप्रधानांच्या संकल्पामध्ये भारत विश्वगुरु व्हावं आणि आपण सोडलेलं चांद्रयान 3 हे चंद्रावर सुरळीतपणे उतरावं अशी प्रार्थना करण्यात आली," अशी माहिती मंदिरातील पुजाऱ्यांनी दिली.


पुणे नगरी विद्वत्तेची दुसरी ओळख - पंतप्रधान नरेंद्र मोदी


"कोणताही पुरस्कार मिळतो तेव्हा आपली जबाबदारीही वाढते. या पुरस्कारासाठी टिळकांचं नाव जोडलं असेल तर दायित्व कित्येक पटीने वाढतं. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मी देशातील 140 देशवासियांच्या चरणी समर्पित करतो. मी देशवासियांना विश्वास देतो की त्यांच्या सेवेत त्यांची आशा, अपेक्षांच्या पूर्तीसाठी कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही. आपल्या देशात काशी आणि पुण्याला विशेष ओळख आहे. पुणे आणि काशीत विद्वत्ता चिरंजीव आहे. येथे विद्वत्तेला अमरत्व प्राप्त झाले आहे. पुणे नगरी विद्वत्तेची दुसरी ओळख आहे. अशा भूमित सन्मानित होणं यापेक्षा गर्वाची दुसरी गोष्ट नाही," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.