नवी दिल्ली : 'पंतप्रधान मोदींशी माझी थोडावेळ व्यक्तीगत भेट झाली. मला जर मोदींना वेगळं भेटायचं असेल तर चुकीचं काय आहे.' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटल्यानंतर आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वेगळ्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली. याबाबत आता उत्सूकता लागली आहे. (PM and CM Personal meet)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी काय नवाज शरीफांना भेटायला गेलो नव्हतो. मी त्यांना भेटायला गेलो तर त्यात वेगळं वाटायला नको. असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. (Cm Uddhav Thackeray Meet Pm Modi)


राज्यात भाजपसोबत बिनसल्याने शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली. पण या 3 पक्षाच्या सरकारमधील अनेक नेते हे अडचणीत आले होते. त्यांच्यावर वेगवेगळे आरोप झालेत. त्यामुळे महाविकासआघाडी सरकार अडचणीत आलं आहे. त्यातच हे जुने मित्र पक्ष आता पुन्हा जवळ आले तर याचा राज्यातील सत्तेवर परिणाम दिसू शकतो. मोदींसोबत आपले संबंध चांगले आहेत. असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.


पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील या वैयक्तीक भेटीनंतर भाजप आणि शिवसेनेमधील संबंध पुन्हा चांगले होतील का? जर तसं झालं तर मग राज्यातील सरकारवर याचा काय परिणाम होईल? या भेटीमुळे काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादी (NCP) हे दोन्ही पक्ष नाराज होतील का? हे देखील आगामी काळात पाहायला मिळू शकतं.


बातमीचा व्हिडिओ