कृष्णात पाटील / विष्णु बुरगे / मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर अचानक बलात्काराचे आरोप  (allegation of rape) होण्यामागे नेमके काय राजकारण आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पैसा किंवा संपत्तीच्या वादातून हे प्रकरण चव्हाट्यावर आलेलं नाही. तर मुंडेंचा राजकीय वारसदार कोण? (Who is the successor of Dhananjay Munde?) या वादातून हे महाभारत घडल्याची माहिती समोर आली आहे. काय आहे हा वारसदाराचा वाद? पाहूयात हा रिपोर्ट.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाभारत असो, रामायण असो, नाहीतर राजेराजवाड्यांचा इतिहास. गादीच्या वारसावरून घमासान घडल्याची अनेक उदाहरणे आहेत. धनंजय मुंडे यांच्या घरातही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार कोण, यावरून कन्या पंकजा मुंडे आणि पुतण्या धनंजय मुंडे यांच्यातला संघर्ष महाराष्ट्राने पाहिला. आता धनंजय मुंडे यांचा राजकीय वारसदार कोण, यावरून आतापासूनच संघर्ष पेटला आहे आणि त्याचीच धग धनंजय मुंडे यांना बसली आहे.


मुंडे यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असलेल्या करूणा शर्मा यांच्या बहिणीने म्हणजे रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचे आरोप केले आहेत. पैशांसाठी हे ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचा दावा स्वतः मुंडे यांनी केला आहे. पण वस्तुस्थिती काही वेगळीच आहे.


मुंडे यांचा परिवार


धनंजय मुंडे आणि पत्नी राजश्री यांना तीन मुली.
वैष्णवी, जान्हवी आणि आदिश्री.
हे सगळे मुंडेंसोबत परळीला राहतात.
तर करुणा शर्मांपासून मुंडेंना दोन मुलं झाली.
शिवाली ही मुलगी आणि शिव हा मुलगा.
हे तिघेजण मुंबईत राहतात.



 
गेल्या काही वर्षांपासून करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंकडे परळीला नेण्याचा तगादा लावला होता. आपला मुलगा शिव याला मुंडेंनी राजकीय वारसदार म्हणून पुढं आणावं, अशी करुणा शर्मांची महत्वाकांक्षा आहे. गेल्या १४ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांनी फेसबुकवर `मै परली वैजनाथ आनेवाली हूं´ अशी पोस्ट केली होती. करूणा शर्माला इंदौरहून मुंबईत आणण्याची चूक मुंडे यांनी आधीच केली होती. आता परळीला नेऊन आणखी मोठी चूक करायची नव्हती. यातूनच दोघांमध्ये खटके उडू लागले. 



धनंजय मुंडेंना त्रास देण्यासाठी खासगी फोटो सोशल मीडियात टाकण्यास त्यांनी सुरूवात केली. हा वाद अखेर हायकोर्टात गेला.. आता करुणा शर्मांची बहिण रेणू शर्मानं मुंडेंवर बलात्काराचा आरोप करून आणखी मोठी खळबळ उडवून दिलीय. पण हे प्रकरण हनी ट्रॅप पुरतं मर्यादित नाही, तर या वादाचं मूळ आहे तो राजकीय वारसदाराचा संघर्षच.