काय आहे त्र्यंबकेश्वराचे महात्म्य ....
श्रावणात त्र्यंबकेश्वरला का होते गर्दी ....
सोनू भिडे, नाशिक- कोरोनामुळे गेले दोन वर्ष त्र्यंबकेश्वर येथील दर्शन बंद होते. गेली दोन वर्ष श्रावण महिन्यात त्र्यम्बक महाधिदेवाचे दर्शन घेता न आल्याने यावर्षी भाविकांनी त्र्यंबकेश्वर येथे मोठी गर्दी केली आहे. श्रावण सोमवारच्या पूर्वसंध्येला त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली. पहाटे दर्शन मिळावे यासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या.
त्र्यंबकेश्वर येथील महत्व
गौतम ऋषी आणि गोदावरी यांच्या प्रार्थनेवरून महादेव हे त्र्यंबकेश्वर येथे विराजमान झाले होते. यानंतर हे ठिकाण त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखू लागले. हे मंदिर पेशवेकालीन आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार सन १७५५ साली झाला होता. ३१ वर्षानंतर म्हणजेच १७८६ साली ते पूर्ण झाले. या मंदिराचे पुनरनिर्माण नानासाहेब पेशवे यांनी केले होते. हे मंदिर काळ्या पाषाणातील दगडाने तयार करण्यात आले आहे.
या मंदिरात एका छोट्या गाभाऱ्यात महादेवाची पिंड आहे. नेहमीप्रमाणे शिवालयात दिसणारे मोठे शिवलिंग इथे आढळून येत नाही. या पिंडात तीन छोटी प्रतिकात्मक विश्वाची रचना करणारे भगवान ब्रम्हा, विष्णू आणि महेश विराजमान असल्याची श्रद्धा आहे. म्हणूनच संपूर्ण भारतातील एकमेवाद्वितीय म्हणून या मंदिरातील महाधिदेवांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून अलोट अशी गर्दी होते. यामुळे संपूर्ण भारतातून भाविक विशेष करून श्रावण महिन्यात त्रंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.
नाथ संप्रदाय
नाथ संप्रदाय हा भारतातील एक शैव संप्रदाय आहे. याचा उगम सुमारे ८ व्या ते १२ व्या शतकात झाला असल्याच म्हटलं जाते. नाथ संप्रदाय किंवा नाथ पंथ याचा उगम त्रंबकेश्वर येथे महादेव यांच्यापासून झाला. आदिनाथ म्हणजे शिव किंवा महादेव असे म्हटले जाते म्हणून त्याला नाथ संप्रदाय असे नाव देण्यात आले. नाथ संप्रदायाची शिक्षा घेतलेल्या व्यक्तीला आपल्या नावानंतर नाथ हा शब्द जोडता येतो. नाथ संप्रदायाची स्थापना मत्स्येंद्रनाथ ऊर्फ मच्छिंद्रनाथ यांनी केली. गोरखनाथ यांनी त्याचा पुढे विकास सुरु ठेवला. यांनतर गोरखनाथानी त्रंबकेश्वर येथे नऊ नाथांना व ८४ सिद्धांना उपदेश केला होता.*वारकरी पंथाचे निवृत्तीनाथही याकव पंथाचे...
वारकरी संप्रदायाचा जन्म
निवृत्तिनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली. सुमारे आठशे वर्षांपूर्वी श्री संत निवृत्तीनाथ महाराज ब्रम्हगिरी पर्वताला प्रदक्षिणा मारत असतना नाथ संप्रदायातील गहिनीनाथांची भेट झाली. यानंतर गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली. यानंतर भागवत धर्माची स्थापना झाली. निवृत्तीनाथानी ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई या तिघेही भावंडांना वारकरी पंथाच्या प्रसाराची जबाबदारी दिली. इथेच तपश्चर्या करत अखेर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांनी आपली समाधी याच ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी घेतली आहे. त्यामुळे लाखो वारकरी या संजीवन समाधीचं दर्शन घेण्यासाठी सातत्याने त्र्यंबकेश्वरात येत असतात*
वारकरी पंथाचे गुरुवर्य संत निवृत्तीनाथ महाराज सातशे वर्षापुर्वी त्रंबकेश्वर मध्ये समाधिस्थ झाले होते. निवृत्ती, नामदेव, सोपान, मुक्ताबाई हे चार भावंड. या भावंडात निवृत्तीनाथ सर्वात मोठे. निवृत्तीनाथांचे थोरले भाऊ नामदेव त्यांना गुरु मानायचे. त्यामुळे आषाढीच्या वारीचा पहिला मान हा संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीला दिला जातो.
स्थानवैशिष्ठ आणि महिमा
ब्रम्हगिरी हे गोदावरीचे उगम स्थान आहे. या गोदावरीचे त्रंबकेश्वर येथून तीन ठिकाणी गुप्त उगम होतो. ब्रम्हगिरी पर्वतावर ,त्यानंतर ती गंगाद्वार आणि नन्तर कुशावर्तात प्रकट होते. चक्रतीर्थ येथून ती खऱ्या अर्थाने प्रवाहित होते . गंगापूर धरणातून तिचा विस्तार होत जातो त्रंबकेश्वर येथे अहिल्या, कपिला आणि गोदावरीचा त्रिवेणी संगम आहे. या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्यात आजही हजारो ऋषी तेथे स्नान करण्यासाठी दर बारा वर्षांनी जमतात. गुरू गोरक्षनाथ बालस्वरूपात तेथे आले व तेही याठिकाणी स्नान करू लागले. त्यांनी 'हर हर गंगे‘ अशी हाक दिली. गंगा नाही, गोदावरी आहे तू तिला गंगा कसे काय म्हणतोस? असे ऋषी गोरक्षनाथ यांना म्हणू लागले. त्या वेळी गोरक्षनाथांनी गंगेची आराधना केली. प्रत्यक्ष गंगा तेथे प्रकट झाली. ऋषींनी गोरक्षनाथ यांना आपण कोण आहात असे विचारले असता गोरक्षनाथ मूळ रूपात प्रकट झाले. तेव्हापासून नाथसंप्रदाय तिला गंगा मानतात. त्यामुळे ज्याला सामान्य व्यक्ती अहील्या-गौतमी संगम म्हणतात, त्यालाच नाथसंप्रदायाचे साधू गंगा-गौतमीचा संगम मानतात. याच संगमावर दर बारा वर्षानी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. गोदावरीच एक उगमस्थान असलेल्या कुशावर्तात स्नान केल्याने आपली कर्मे शुद्ध होतात अशी भाविकांमध्ये श्रद्धाही आहे . हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर निर्वाणी आणि निर्मोही असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. देशातील सर्व शैव पंथयांचे हे पूज्य स्थान आहे.