Uddhav Thackeray : शिवसेनेचे 'धनुष्यबाण' हे निवडणूक (Shivsena Symbol) चिन्ह गोठविण्याचा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगाने (EC) शनिवारी घेतला तसेच या दोन्ही गटांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हद्वारे (Uddhav Thackeray Facebook Live) महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटावर (Shinde Group) बाण सोडत आगामी पर्यायांविषयी माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाकरेंच्या शिवसेनेचं नवीन नाव काय? (Shivsena New Name)


त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल अशी 3 चिन्ह निवडणूक आयोगाला दिली आहेत. त्याचबरोबर पक्षासाठी तीन नावं देखील उद्धव ठाकरे यांनी सुचवली आहेत. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, अशी नावं सुचवण्यात आली आहेत.


श्रीरामचंद्राचं धनुष्यबाण यांनी गोठवलं. 40 डोक्यांचा रावण फिरतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना नावाशी तुमचा संबंध काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला खोकासूरांची उपमा दिली. शिवसैनिक आहोत म्हणून आम्ही आहोत. आता सहनशीलतेता अंत झालाय, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत.


दरम्यान, दिवस आणि रात्र वैऱ्याची आहे सावध रहा, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय. यावेळी उद्धव ठाकरे भावूक झाल्याचं पहायला मिळालं. ज्यांना सर्वकारी दिलं, तेही गेलं. आपण काय बोललो नाही. मात्र, आता अति होतंय. शिवसेना प्रमुख व्हायला निघालेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.


पाहा व्हिडीओ-