जितेंद्र शिंगाडे, नागपूर : उन्हाळा आला की बच्चे कंपनीलाच नाही तर मोठ्यांना सुद्धा वॉटर पार्कचे आकर्षण असते. उकडत्या ऊना मुळे सगळेच अत्यंत त्रासलेले आहेत. उन्हाळ्यात वॉटर पार्कला जाण्याचा बेत आखत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. नागपुरातले काही मित्र-मैत्रिणी वॉटर पार्कमध्ये सहलीला गेले होते. तिथे त्यांनी पाण्यात भरघोस आनंद लूटला. पण तिथून बाहेर पडताच हे सगळे चक्रावून गेले  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरातल्या द्वारका वॉटर पार्कमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी एक ग्रुप आला होता. नागपुरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ५६ जणांचा या वॉटर पार्कमध्ये आला होता. विविध राईडसचा आनंद घेतल्यानंतर वॉटर पार्कमधून बाहेर पडताच अनेकांचे डोळे लाल झाले, दुसऱ्या दिवशी ३० जणांच्या त्वचेवर पुरळ उठले, भेगा पडल्या, त्वचेला खाज सुटू लागली.  


या विद्यार्थ्यांनी वॉटर पार्कच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला, पण दाद न मिळाल्यानं वॉटर पार्कविरोधात तक्रार नोंदवण्याच आली. पण त्यादिवशी वॉटर पार्कमध्ये बाराशे जणांनी आनंद लुटला, त्यापैकी याच ग्रुपमधल्या ३० जणांना हा त्रास झाला. 


वॉटर पार्कच्या पाण्यात क्लोरीन आणि ब्रोमीनसारखे घटक असतात... त्यांचं प्रमाण पाण्यात जास्त झालं किंवा पाणी ठराविक कालावधीत बदललं नाही तर त्वचेची समस्या उद्भवू शकते. वॉटर पार्कमध्ये जायचं असेल तर आधी सनस्क्रीन लावून जा. तसंच वॉटर पार्कमधून आल्यानंतर स्वच्छ पाण्यानं आंघोळ करा. असे त्वचा रोग विशेषज्ञ डॉ ईशा अग्रवाल यांनी सांगितले आहे.