बंदुकीचा व्हाट्सअप स्टेट्स पडला महागात, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
Pimpri-Chinchwad: कोयता भाईनंतर पिंपरी-चिंचवडच्या गुंडा विरोधी पथकाने आणखी एका भाईला अटक केली आहे.
पिंपरी-चिंचवड : Pimpri-Chinchwad: कोयता भाईनंतर पिंपरी-चिंचवडच्या गुंडा विरोधी पथकाने आणखी एका भाईला अटक केली आहे. देशी बनावटीची बेकायदा बंदूक बाळगत व्हाट्सअपवर स्टेट्स (WhatsApp states) ठेवणे या भाईला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
आरशान शेख असे या 25 वर्षीय भाईचे नाव आहे. त्याचा साथीदार उमेर शेख यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरशान शेख याने बंदूक हातात घेत काढलेला व्हिडिओ व्हाट्सअपला स्टेटस ठेवला होता. या स्टेट्सनंतर पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्याकडे देशी बनावटीची बंदूक आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
आमच्या भाईच्या कानाखाली का मारली ?
दरम्यान, सोन्याचा शर्ट घेतल्याने चर्चेत आलेले आणि काही वर्षांपूर्वी हत्या झालेला गोल्डमॅन दत्ता फुगे याच्या मुलाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. भोसरीमध्ये अमन सुरेश डांगळे याचा ममिळाला होता. या हत्येचा तपास सुरु असताना पोलिसांनी शुभम फुगे याला आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली होती. मृतदेह सापडलेला अमन आणि ते तिघे आरोपी मित्र होते. दारु पित असताना अमनआणि शुभम फुगे यांच्यात वाद झाला.
त्यानंतर डांगळे याने शुभम याच्या कानाखाली मारली. त्याचा राग आल्याने शुभम आणि त्याच्या दोन साथीदारांनी त्याची हत्या केली. आमच्या भाईला कानाखाली का मारली, असा सवाल करत अमनची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे आले.आरोपीमध्ये एक अल्पवयीन आहे. विशेष म्हणजे या तिघांवर अनेक गुन्हे दाखल आहेत.