Ajit Pawar On vidhansabha election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुक आयोगाने देखील तयारी सुरु केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही तारीख झालेली नाही. महाराष्ट्रात निवडणुका कधी होणार? आचार संहिता कधी लागणार? याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तसेच येत्या दहा दिवसात अनेक जण पक्ष बदलतील असेही अजित पवार म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या दोन तीन दिवसात आचारसंहिता लागू होईल. दिवाळी नंतर निवडणुका होतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहेत.  सगळेच जण उमेदवार जाहीर करतील.  आयाराम गयाराम ही जोरात आहेत.  येत्या दहा दिवसात अनेकजण पक्ष बदलताना आपल्याला दिसतील असं मोठ विधान देखील अजित पवार यांनी केले आहे. 


महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत. महायुती आणि मविआमध्ये जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मविआमध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात जागावाटपावरून वाद सुरू आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीमध्ये देखील अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात जागावाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचितनं 11 उमेदवारांची यादी जाहीर करून आघाडी घेतलीय. 


विधानसभा निवडणुकांचा वेध सर्वच पक्षांना लागला आहे आता आचारसंहिता कधी लागणार याकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागलंय. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलंय.विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केलीय. त्याचबरोबर निवडणूक आयोग देखील कामाला लागला आहे.