Maharashtra Assembly Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. यावेळी महाराष्ट्रातील निवडणुकींच्या तारखादेखील जाहीर केल्या जातील अशी अपेक्षा होती. मागच्या वेळी महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या होत्या. दरम्यान महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या तारखा का जाहीर करण्यात आल्या नाहीत? असा प्रश्न निवडणूक आयुक्तांना विचारण्यात आला. यावर त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. 


महाराष्ट्र निवडणुकीबद्दल काय म्हणाले निवडणूक आयुक्त ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला निवडणूक आयुक्तांनी उत्तर दिले. महाराष्ट्रात सध्या पावसाळा सुरु आहे. एकामागोमाग एक सण उत्सव येत आहेत. त्यामुळे यावेळेस महाराष्ट्रातील निवडणुकींची घोषणा करण्यात आली नाही, असे ते म्हणाले. यावेळी महाराष्ट्रातील निवडणुका हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकांसोबत होणार नाहीत,असे ते म्हणाले.


महाराष्ट्रात मान्सून आणि सण 


हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये एकत्र निवडणूका होणार आहेत. पण महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता त्यांच्यासोबत इथे निवडणुका नाहीत. महाराष्ट्रात पावसाळा असल्याने मतदार यादीचे नाव लांबले आहे. पितृपक्ष, दिवाळी आणि गणेश चतुर्थीसारखे प्रमुख सण साजरे होत आहेत. यामुळे निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो. 


विधानसभेचा कार्यकाळ


26 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होतोय. महाराष्ट्रातील विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या 6 महिने आधी निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. हा विशेषाधिकार आयोगाला आहे.