औरंगाबाद : Raj Thackeray's Aurangabad Sabha : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याची बातमी. राज ठाकरे यांच्या सभेला आज परवानगी मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आज बैठक आहे. राज ठाकरे सभा परवानगी कधी मिळणार याची उत्सुकता आहे. मनसे, पोलिसांकडून ग्राऊंडची पाहणी करण्यात आली आहे. त्याचवेळी दुसरीकडे अयोध्या दौऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी मनसेने सुरु केली आहे. राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शरयूकाठी राज ठाकरे महाआरती करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी दौऱ्याच्या नियोजनासाठी पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक झाली. 2 ते 3 जूनपासूनच कार्यकर्ते अयोध्येला जाणार आहेत. प्रत्येक विभाग अध्यक्षांना कमीत कमी एक बोगी भरण्याची सूचना करण्यात आलीय. मनसेने या दौ-यासाठी 10 ते 12 गाड्यांची मागणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंकडे केलीय. राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, काही अटी असणार आहेत.


यात ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे लागणार आहे. लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी लागणार आहे. तसेच इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे.  1 मे रोजी महाराष्ट्र दिन असल्याने धर्म, प्रांत, वंश, जात यावरुन कोणतेही वक्तव्य करु नये. तसेच व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी लागणार आहे. तसेच सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करु नये आणि वाहन पार्किंगचे नियम पाळावे, अशा काही अटी असणार आहे. 


सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.  जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल, सामाजिक सलोखा बिघडेल, असे कुठलंही वर्तन करता येणार नाही.