Mhada Lottery 2023: म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फ ४,०८३ घरांची 14 ऑगस्ट रोजी सोडत जारी करण्यात आली. म्हाडाच्या लॉटरीनंतर ज्यांना घरे लागली आहेत. त्या विजेत्यांना घराचा ताबा कधी मिळणार प्रश्न पडला आहे. यासाठी म्हाडाकडून आता प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हाडाच्या विजेत्यांना आता सूचना आणि देकार पत्र पाठवले जात आहे. (Mhada Lottery Winners)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

14 ऑगस्ट रोजी म्हाडाची लॉटरी काढण्यात आली. त्यात सुमारे 4 हजार जणांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. पण ज्या अर्जदारांना घर लागले नाही अशा अर्जदारांना अनामत रक्कम परत करण्यास म्हाडाकडून सुरुवात झाली आहे. तर, विजेत्यांना सूचना आणि देकार पत्र पाठवले जात आहे. विजेत्यांना म्हाडाच्या घराची स्वीकृती आणि ताबा सोडण्यासाठी 28 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली जाणार आहे. 28 ऑगस्टनंतर म्हाडाकडून देकार पत्र देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. 


30 ऑगस्टनंतर घराचा ताबा देण्याची प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू होईल व घराची रक्कम जमा केल्यानंतर लगेचच विजेत्यांना घराचा ताबा दिला जाईल, असं म्हाडाकडून सांगण्यात येत आहे. देकार पत्र पाठवल्यानंतर 45 दिवसांत घराच्या एकूण किमतीच्या 25 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम वेळेत न भरल्यास घर रद्द केले जाऊ शकते. घराचा ताबा देण्याच्या प्रक्रियेनुसार पहिल्यांदा 25 टक्के आणि नंतर 75 टक्के रक्कम अर्जदारांना भरता येणार आहेत. त्या सप्टेंबरअखेर म्हाडाच्या विजेत्यांना घराचा ताबा मिळण्याची शक्यता आहे. 


विजेत्यांसाठी म्हाडाची अपडेट


विजेत्यांना कादपत्रांती पूर्तता करण्यासाठी बँकेत फेऱ्या माराव्या लागत होता. स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्टेशन फी जमा करण्यासाठी बँकेत सारख्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, विजेत्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी म्हाडाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. म्हाडाने एकल खिडकी योजनाअंतर्गंत म्हाडाच्या मुख्यालयातच सर्व प्रक्रिया पार पाडण्याची व्यवस्था करत आहेत. 


कर्ज प्रक्रियादेखील होणार सोप्पी


म्हाडाने विजेत्यांना सोप्या पद्धतीने कर्ज मिळवून देण्यासाठीही प्रय़त्न केले आहेत. म्हाडाने काही बँकांसोबत करार केले आहेत. म्हाडाने सोडतीनंतरच्या सर्व अनिवार्य प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लोकांचा त्रास वाचवण्यासाठी मोठं पाऊल उचलले आहे. म्हाडा कार्यालयातच मुद्रांक शुल्क आणि डिजिटल नोंदणी केंद्र सुरू करत आहे.लॉटरी विजेत्यांना मालमत्ता नोंदणी कार्यालयात जाण्याची गरज नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.