नागपूर : शहरातील आयटी पार्क परिसरात आलेल्या बिबट्या (leopard) कुठे आहे ? अंबाझरीच्या दिशेने तो परत गेला का,  असे सवाल उपस्थित होत आहेत. त्याचा  माग काढण्यात तीन दिवसांनंतरही वन विभागाला यश मिळालेलं नाही. त्यामुळे हा बिबट आयटी पार्कमध्ये आहे की परत  निघून गेला याबाबत संभ्रम आहे. एका सॉफ्टेवेअर कंपनीच्या सीसीटीव्हीत बिबट कैद झाला असला तरी वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेरातही बिबटया अजूनपर्यंत दिसलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरातील आयटी पार्क लगतच्या गायत्रीनगर परिसरात शुक्रवारी बिबिटया सर्वप्रथम स्थानिक नागरिकांना दिसला होता.त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली..त्यानंतर वन विभागाच्या टीमने बिबट्याच्याशोधमोहीम सुरु केली. सुमारे 50 जणांची टीम बिबटच्या शोधासाठी रात्रदिवस गस्त घालत आहे. परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. मात्र हा बिबटया वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसला नाही. 


दरम्यान शनिवारी पहाटेच्या सुमारास एका आयटी कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेरात त्याचे दर्शन झाल्याने या परिसरात त्याचा संचार असल्याचे निदर्शनास आले. पुन्हा त्याची शोधमोहिम अजून तेज करण्यात आली. दरम्यान या परिसरात ज्या ठिकाणांहून बिबट प्रवेश करू शकतो, त्या मार्गांची पाहणी करीत तिथे कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. युद्ध पातळीवर वनकर्मचारी तपास करीत आहेत. 


आयटी पार्कच्या शेजारीच व्हीएनआयटीचा परिसरात विस्तर्ण परिसर आहे...तिथे जाण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी  अंबाझरी जैवविविधता उद्यान परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. तेव्हापासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सिद्ध झालं होते.  आता शहरात आलेला बिबट्याही अंबाझरीच्या परिसरातूनच आल्याचा संशय वनविभागाला आहे. वनविभागाची रात्रंदिवस गायत्री नगर, आयटी पार्क आणि आजूबाजूच्या परिसरात गस्त सुरु  असताना  परिसरातील नागरिकांनी एकटे फिरु नये तसेच लहान मुलांना  एकटे सोडू नये, असे आवाहनही विनविभागाने केले आहे.


 तीन दिवसांपासून जास्त कालावधी झाला तरी  बिबट्यांचा थांगपत्ता अजून लागाला नाही. दोन दिवसांपासून तो कुठेच दिसला नाही. वनविभागालाही गेल्या दोन दिवसात त्याचे अस्तित्वाचे पुरावे दिसत नाही. त्यामुळे तो पुन्हा अंबाझरीच्या परिसरात परतला तर नाही ना अशी शंका व्यक्त होत आहे.