अहमदनगर : अहमदनगर पोटनिवडणुकीत २ शिवसैनिकांना गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत, यात संजय कोतकर आणि वसंत ठुबे या शिवसैनिकांचा समावेश आहे. यात अहमदनगर शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी झी २४ तासशी बोलताना २ आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. दिलीप सातपुते यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितलं की, संजय कोतकर यांना गोळ्या घातल्या तेव्हा मला त्यांनी फोनकरून सांगितलं की मला गोळ्या घालण्यात आल्या आहेत, यात भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले आणि , राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप, त्यांचा मुलगा संग्राम जगताप यांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पाहा कुणी केले हे गंभीर आरोप


हे आरोप दिलीप सातपुते यांनी केले आहेत. मात्र अजून दोन्ही संबंधित आमदारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एकंदरीत अहमदनगरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार आघाडी घेत असल्यानंतर ही हिंसा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. अहमदनगर शहरात झालेल्या हिंसाचारानंतर शिवसैनिकांनी अहमदनगर पुणे हायवेवर रास्तारोको सुरू केला आहे. मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे.