मुंबई : मराठवाड्यात लोकसभेच्या एकूण ८ जागा आहेत. यापैकी भाजपला ४, शिवसेनेला २, राष्ट्रवादीला २ तर काँग्रेसला ० जागा मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत येथे काही मोठ्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद : येथे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील, अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव आणि काँग्रेसचे सुभाष झांबड यांच्यात टक्कर आहे. पण शिवेसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा येथे विजय होण्याची शक्यता आहे.


जालना : जालन्यातून भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे विलास औताडे यांच्यात लढत आहे. पण रावसाहेब दानवे येथून बाजी मारतील.


नांदेड : भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्यात लढत आहे. यंदा मात्र अशोक चव्हाण यांचा पराभव होण्याची शक्यता आहे.


परभणी : राष्ट्रवादीचे राजेश विटेकर आणि शिवसेनेचे सुनील जाधव यांच्यात लढत आहे. येथून राष्ट्रवादीचे विटेकर यांचा विजय होऊ शकतो.


हिंगोली : हिंगोलीमधून शिवसेनेचे हेमंत पाटील यांची लढत काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्यासोबत होती. शिवसेनेचे हेमंत पाटील यांचा विजय होण्याची शक्यता आहे.


बीड : बीडमधून भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांचा विजय होऊ शकतो. राष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणे यांचा पराभव होण्याची शक्यता.


उस्मानाबाद : राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय होण्याची शक्यता. शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर पराभवाच्या वाटेवर दिसत आहेत.


लातूर : लातूरमध्ये भाजपचे सुधाकर श्रृंगारे यांचा विजय होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत यांचा पराभव होण्याची शक्यता.