Shivsena Dasra Melava:  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बंड करून मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांच्यात आज प्रथमच थेट शाब्दिक सामना सुरू आहे. मुंबईत आयोजित दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्यासाठी (Dasara melava 2022) जय्यत तयारी करण्यात आली होती. त्यानंतर आता दोन्ही नेत्यांनी तोफ डागण्यास सुरूवात केली आहे. अशातच शिवसेना नेमकी कोणाची या बहुचर्चित प्रश्नाचं उत्तर खुद्द एकनाथ शिंदे यांनी दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना ना एकनाथ शिंदे यांची... ना शिवसेना उद्धव ठाकरेंची... शिवसेना कोणाची असेल तर ती फक्त बाळासाहेबांची आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिवसेना म्हणजे बाळासाहेबांचे विचार... आम्ही बाळासाहेबांचे वारसदार आहोत. आम्ही गद्दार नाही बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. तुम्ही बापाला विकण्याचा प्रयत्न केला, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर (Shivsena dasara melava) केली आहे.


गद्दारी नाही तर आम्ही गदर आहोत. आम्हाला सत्तेपेक्षा सत्य आणि सत्व महत्वाचं.आम्ही केलं ते राज्याच्या हितासाठी केलं. शिवसेनेचा रिमोट राष्ट्रवादीच्या हातात आहे. आमची भूमिका जनतेला देखील मान्य आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.


खरे गद्दार तुम्ही आहात. शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकला. गद्दारांना साथ देयची नाही, हे जनतेने ठरवलं आहे. बाळासाहेबांच्या समाधीवर गुडघे टेका आणि माफी मागा, असं आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. 


उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली, विचारांना तिलांजली दिली. मग तुम्हाला त्या जागेवर उभा राहण्याचा आणि बोलण्याचा नैतिक अधिकार तरी उरतो का? हजारो शिवसैनिकांनी आपला घाम, रक्त, सांडून जो पक्ष उभा केला तो तुम्ही तुमच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी, महत्त्वकांक्षेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गहाण टाकला, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी तोफ डागली.