मुंबई : कोरोना लस घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह आल्याची घटना औरंगाबादेत गेल्या आठवड्यात समोर आली होती. त्यामुळे कोरोना लस पुर्णतः प्रभावी आहे की नाही. याबाबत असंख्य शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसीकरण होऊनही कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह  येण्यामागची कारणं काय आहेत? त्याबाबत तज्ज्ञांचे मतं काय आहेत? ते पाहूया.


  1. कोव्हिड प्रतिबंधक लशी अल्पावधीत बनल्या असल्याने त्यांची  परिणामकारता कमी जास्त  असू शकते. कोणत्याही लशीची कार्यक्षमता १०० टक्के असू शकत नाही.  कोव्हिडशिल्डची कार्यक्षमता 62 टक्के आहे.

  2. कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचीही माहिती अद्यापही समोर आलेली नाही. याच लशीच्या दुसऱ्या टप्प्यातील परिणामकारता 82 टक्के असल्याचे निर्मात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे लशीचा दुसरा डोस घेतला तरी कोव्हिड पॉझिटिव्ह येणे अशा काही घटना समोर येऊ शकतात. 

  3. भौगोलिक कारणंही यामागे असू शकतात. अफ्रिका, युरोपातील आपल्याकडच्या लशी परिणामकारक ठरतीलच असे नाही. त्यामुळे भिन्न विषाणू असल्यास लशीची परिणामकारता कमी होऊ शकते.

  4. तज्ज्ञांच्या मते दोन लशीमध्ये अंतर तीन महिण्यांचे असते. तर ती सर्वात प्रभावी व परिणामंकारक ठरते. परंतू आपल्याकडे दोन डोसमधील अंतर चार आठवड्यांचे आहे.  हे देखील त्यामागील एक कारण असू शकते.

  5. सर्वात महत्वाचं म्हणजे लस घेतली म्हणून लोकं निर्धास्त होतात. कोरोना प्रतिबंधक  नियमांचं पालन करीत नाही. त्यामुळेही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येण्याच्या शक्यता असतात. 

  6. लस घेऊनही पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असली तरी, याचा अर्थ हा नाही की आपण लस घेऊ नये. लस घ्यायला हवी. आणि  कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करायलाच हवे.