Aditi Tatkare On Mumbai Goa Highway :  मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या 10 ते 15 वर्षांपासून रखडलेले आहे. राज्यात सत्तेत येणारं एकही सरकार मुंबई गोवा महामार्गाचं नेऊ शकलेले नाही. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण व्हाव यासाठी कोकणवासींयांनी अगदी देवाला देखील साकडं घातलेलं आहे.  मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करण्यात सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधी इच्छाशक्ती कमी पडली हे दुर्देवीच आहे अशी कबुली महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी 'टू द पॉईंट'या कार्यक्रमात दिलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलंय असा प्रश्न  टू द पॉईंट मुलाखतीत आदिती तटकरे यांना विचारण्यात आला. यावेळी वास्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला.   मला माझ्या मतदार संघात चांगले काम करायचे आहे. माझ्या मतदार संघाच्या विकासाबाबत माझे एक व्हिजन आहे जे राजकारणाच्या पलीकडे आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष होते तेव्हा सर्व प्रथम मी मुंबई गोवा महामार्गाचे काम मार्गी लावावे यासाठी निवेदन दिले होते. 


मुंबई गोवा महामार्ग बनत नाही हे दुर्दैवी आहे. समृद्धी महामार्ग हा नॅशनल हायवे नाही. हा महामार्ग राज्य सरकारने तयार केला आहे. समृद्धी महामार्ग बांधताना जमीन अधिग्रहण करताना फार अडचणी आल्या नाहीत. मात्र, मुंबई-गोवा महामार्गाच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात अनेक केसेस प्रलंबित आहेत. यासह अनेक कारणांमुळे मुंबई-गोवा महामार्गचे का मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले असल्याचे आदिती तटकरे म्हणाल्या. 


कोकणातील प्रत्येक लोकप्रतिनीसाठी मुंबई गोवा महामार्गाचे काम 10 ते 15 वर्ष रखडने ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. ब्लेम गेम मुळे मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण करुन घेण्यात आम्ही अपयशी ठरलो.  कोकणातील लोकप्रतिनींची इच्छाशक्ती कमी पडली अशी खंत. मागच्या चार महिन्यात  मुंबई-गोवा महामार्गच्या कामाचा स्पीड वाढला आहे. यंदा गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल असे आमचे प्रयत्न असल्याचे आदिती तटकरे म्हणाले.