पतीचा खून करून पत्नीने ठोकली धूम
पत्नीने पतीवर केले धारदार शस्त्राने वार, हल्ल्यात पतीचा मृत्यू ....
सोनू भिडे, नाशिक:
कोणतेही महत्वाचे काम करताना डोक शांत ठेवणे आवश्यक असते आणि आपण ते करतो सुद्धा. मात्र पतीच्या छळाला कंटाळलेल्या पत्नीने डोक शांत ठेवत पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिक शहरातील वडाळा गावात शनिवारी खून (Murder) झाल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेचा तपास करत असताना पोलिसांच्या तपासात समोर आल आहे.
असा केला खून
नाशिकच्या (Nashik) वडाळा गावातील माळी गल्लीत दिलीप कदम त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहतात. रोज रात्री जेवण झाल्यानंतर दिलीप त्यांच्या पत्नी (Wife) कडून पाय दाबून घेत होता. यावेळी पत्नी नंदाबाई याना शिवीगाळ करत मारहाण सुद्धा करत होता. हा त्रास नेहमीच झाल्याने पत्नी नंदाबाई कदम त्रासल्या होत्या. नेहमी प्रमाणे गुरुवारी (२२ सप्टेंबर) जेवण झाल्यानंतर नंदाबाई यांना पाय दाबण्यास सांगितले. यामुळे दिलीप यांनी नंदाबाई यांना शिवीगाळ केली याचा राग आल्याने नंदाबाई यांनी पती (Husbanad) दिलीप यांच्या डोक्यात लाकडी फळीने वार केला यात दिलीप बेशुद्ध झाला होता. दिलीप शुद्धीवर आल्यानंतर पुन्हा मारहाण करेल या भीतीने नंदाबाई यांनी त्याचे हात पाय दोरीने बांधून ठेवले आणि धारदार शस्त्राने पोटावर हातावर आणि डोक्यावर वार केले. यात दिलीप याचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह (Death Body) पलंगाखाली लपवून ठेवला होता. शनिवारी (२४ सप्टेंबर) रात्री दुर्गंधी येऊ लागल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतल्यानंतर दिलीप यांचा मृतदेह घरात कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता. मुलाच्या फिर्यादीनुसार इंदिरा नगर पोलीस ठाण्यात (Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अस झालं उघड
शनिवार पासून नंदाबाई या बेपत्ता असल्याने पोलिसांना नंदाबाई यांच्यावर संशय होता. पोलिसांनी सुद्धा त्यांना शोधण्याचा प्रयन्त केला अखेर संशयित आरोपी नंदाबाई ह्या येवला येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नंदाबाई यांना अटक केल्यानंतर चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.