मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा फेब्रुवारी २०२१ मध्ये राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाल्यापासून राज्य विधिमंडळाची तीन अधिवेशने पार पडली. मात्र, या अधिवेशनांमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आघाडी सरकारने नियमात बदल केला होता. त्यावरून एकच आघाडी सरकार आणि विरोधक भाजप यांच्यात एकच रणकंदन माजले होते.


आघाडी सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठविला होता. मात्र, या प्रस्तावावर सही करण्यास राज्यपालांनी नकार दिला. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात ही निवड होऊ शकली नव्हती. 


३ मार्चपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरु होत आहे. तीन आठवड्यांचे हे अधिवेशन असून दुसऱ्या आठवड्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. ११ मार्चला अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापूर्वीच ही निवडणूक घेण्यावर आघाडी सरकारचा भर आहे.


आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख राज्यपालांना अवगत करण्यात येणार आहे. 


अध्यक्षपदासाठी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचं नाव चर्चेत होते. त्यात आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रसचे मुंबईतील आमदार अमीन पटेल यांचंही या पदासाठी चर्चेत येत आहे.