भाजपसोबत जाणार? शरद पवार यांनी भूमिका मांडली; अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या भेटीनंतर मोठी अपडेट
आपल्याला भाजपसोबत जायचं नाही अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी बैठकीत आपल मत मांडलं. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे.
Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतली. एकत्र काम करण्याबाबत पवारांची मनधरणी करण्यात आली. तसेच अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. या भेटीनंतर शरद पवार यांनी भाजप सोबत जाण्याबाबत भूमिका मांडली आहे. अजित पवार गट भेटी नंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मला भाजपसोबत जायचं नाही अस मत शरद पवार यांनी मांडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पुरोगामी विचार असणाऱ्या सोबत राहणे. युवक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी बैठकीत पवार यांनी मत मांडले. युवक पदाधिकारीची बैठक एनसीपी प्रदेश कार्यालय येथे पार पडली.
अजित पवार गटाच्या सर्व मंत्र्यांनी पहिल्यांदाच एकत्रितपणे शरद पवारांची भेट घेतली
राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवार गटाच्या सर्व मंत्र्यांनी पहिल्यांदाच एकत्रितपणे शरद पवारांची भेट घेतली. मुंबईच्या वाय.बी.सेंटरमध्ये शरद पवारांची भेट घेत त्यांनी राष्ट्रवादी एकसंध राहण्यासाठी एकत्रित काम करण्याची विनंती पवारांना केली. पवारांनी आपलं म्हणणं ऐकून घेतलं मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही असं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय. तर पवारांनी अजित पवारांच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतलेला नाही असही राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीपल यांनी सांगितले होते. त्यामुळे आता शरद पवार अजित पवार गटाचं म्हणणं ऐकणार की, आपली वेगळी चूल कायम ठेवणार याकडेच सर्वांचं लक्ष लागल होते.
शरद पवारांनी जाहीर केली भूमिका
या भेटीनंतर शरद पवारांनी भूमिका मांडताना भाजपसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे येत्या काळात राष्ट्रवादीच्या या दोन्ही गटातील संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो. असी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कुणाची, याबाबतचा संघर्ष आणखी टोकाला जाणार
अजित पवार यांचा मोठा गट सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवार यांच्यासह 9 आमदारांना मंत्रीपद मिळालेय. राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कुणाची, याबाबतचा संघर्ष आणखी टोकाला जाणार आहे. कारण, शरद पवारांऐवजी अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडं करण्यात आलाय. अजित पवार गटानं निवडणूक आयोगाला 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र दिलंय. या पत्रात 30 जूनला अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमतानं निवड झाल्यांचं म्हंटलंय. विशेष म्हणजे शपथविधीच्या 2 दिवस आधीच अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाला हे पत्र देण्यात आल्याचं समोर आलंय. दरम्यान, अजित पवारांची ही कृती म्हणजे काकांना घरट्यातून बाहेर काढण्याचा डाव आहे अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली.