रत्नागिरी : Rajan Salvi on Shinde group entry : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) या पक्षाचे उपनेते आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी काँग्रेसचे अविनाश लाड यांची भेट घेतल्याने साळवी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ते ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याचे बातमी समोर आली. मात्र, राजन साळवी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मी निष्ठावंत आहे, याचा पुरावा देण्याची गरज नाही. सध्याच्या साऱ्या घटनांमध्ये भाजपचा हात आहे, त्यांचं हे षडयंत्र आहे, असा आरोप साळवी यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाकरे गटाला अजूनही धक्के बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले राजापूरचे आमदार राजन साळवी हे शिंदे गटात दाखल होण्याची शक्यता आहे. पुढच्या काही दिवसांत त्यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब  होण्याची शक्यता आहे, असे वृत्तसमोर आले. त्यानंतर आमदार साळवी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी निष्टवंत आहे याचा पुरावा देण्याची गरज नाही. यापुढेही मी शिवसेनेच्यावतीने उद्धव ठाकरेंच्या पुढाकाराने राजापूर मतदार संघातून निवडणूक लढणार आहोत. यापुढेही मी याच मतदार संघातून निवडून येणार, असा दावा सावळी यांनी केला आहे.


रिफायनरी प्रकल्पबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प बारसूमध्ये व्हावा ही स्थानिकांची मागणी आणि रोजगार मिळावा त्यामुळेच मी या प्रकल्पांच्या बाजूने आहे. काही दिवसांतच शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, असे काही सांगितले जात आहे. हे सध्याच्या साऱ्या घटनांमध्ये भाजपचा हात आहे. त्यांचेच षडयंत्र आहे. त्यामुळे भविष्यात भाजप आणि त्यांचे नेते नष्ट होतील, अशी टीका शिवसेनेचे उपनेते राजन साळवी यांनी केली आहे.


मी निष्ठावंत आहे याचा पुरावा देण्याची गरज नाही, असे शिवसेना नेते आणि राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी ठणकावले आहे. भाजप हा पक्ष आप आपसात भांडण लावणे आणि कुरघोडी करणे हे त्यांचं काम सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, आता निवडणूक आयोगाने जे निर्णय दिले, ते प्रत्येक पक्षाने मान्य केले. त्यामुळे ही मशाल घेऊन राज्यात झंजावात करणार आणि विजयी होणार, असे साळवी म्हणाले. भाजप हा पक्ष आप आपसात भांडण लावणे आणि कुरघोडी करणे हे त्यांचं काम आणि राज्यात जे काही चालू हे भाजपचं काम आहे, असा भाजपवर त्यांनी हल्लाबोल केला.