चंद्रपूर : सुभाष देसाई आणि प्रकाश मेहता या नेत्यांची नावे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन चर्चेत आली असताना येत्या हिवाळी अधिवेशनात आणखी दोन नेत्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याचा गौप्यस्फोट विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे दोन्ही मंत्री विदर्भाचे असून त्यांची नावं सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिलाय. या भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालून मुख्यमंत्र्यांनी आपला पारदर्शी कारभार राज्यातील जनतेला दाखवून दिलाय अशी टीकाही त्यांनी केली. त्यामुळे येणारं  हिवाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.