उदयनराजे भोसले यांच्यावर कारवाई करणारच - दीपक केसरकर
योग्यवेळी पोलीस साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर कारवाई करणारच असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेय. त्यासाठी उदयनराजे यांच्या आवाजाचेही नमुने घेतले जाणार आहेत.
मुंबई : योग्यवेळी पोलीस साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर कारवाई करणारच असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेय. त्यासाठी उदयनराजे यांच्या आवाजाचेही नमुने घेतले जाणार आहेत.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून उदयनराजे यांच्यावर पोलिसांनी रात्री कारवाई केली नाही. पोलीस योग्य वेळी कारवाई करतील. उदयनराजे यांच्या आवाजाचा नमुना पोलिसांना घ्यायचा आहे. तो ते कधीही घेऊ शकतात, असे दीपक केसरकर म्हणालेत.