Nagpur Goa Shatabdi Mahamarg :  नागपूर आणि गोव्याला जोडणा-या शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला जातोय. या महामार्गाविरोधात शेतकरी अधिक आक्रमक झाले होते. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी 12 जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येणार आहेत. शक्तिपीठ महामार्ग विरोधात 12 ऑगस्टला राज्यभरात महा धरणे आंदोलन केले जाणार आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्द होणार का?  अशी चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या 12 ऑगस्ट ला शक्तिपीठ महामार्ग जाणाऱ्या बारा जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करणार आहेत. याबाबतची घोषणा कांग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात केली आहे. कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात आज शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या महाधरणे आंदोलनाबाबत 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऑनलाइन बैठक घेतली जाणार असल्याचा देखील आमदार सतेज पाटील यांनी सांगितल आहे. सरकारने अजून देखील शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा केलेली नाही, त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आक्रमक झाले आहेत.


 कोल्हापूर आणि सांगलीमधला हा विरोध आहे तो शक्तिपीठ महामार्गाला... कोल्हापूर तसंच सांगलीसह एकूण 11 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जातोय.. मात्र शेकडो एकर जमीन प्रभावीत होत असल्याने तो रद्द करण्याची मागणी शेतकरीच नाही तर सत्ताधारी पक्षातले मंत्री तसंच आमदारसुद्धा करतायत.. कोल्हापुरातले शिंदे गटाचे पराभूत खासदार संजय मंडलिक यांनीही शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलंय. लोकसभा निवडणुकीत शक्तीपीठ महामार्गाचा जबर फटका महायुतीला बसल्याचा दावा या सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी केलाय. त्यामुळेच शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी नेते एकवटले आहेत.


शक्तिपीठ महामार्गाची वैशिष्ट्य


वर्ध्यातल्या पवनारमधून सुरु, गोव्याच्या सीमेवर पत्रादेवीला समाप्त
नागपूर ते गोवा प्रवासासाठी 18 तास लागतात.. तोच प्रवास शक्तिपीठ महामार्गाने 8 तासांत शक्य
वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे
802 किलोमीटरचा प्रस्तावित रस्ता.. 86 हजार कोटी खर्च... 27 हजार एकर जमिन संपादित केली जाणार
सेवाग्राम, पोहरादेवी, माहुरगड, ओंढा नागनाथ, परळी वैजनाथ, आंबाजोगाई, तुळजापूर, पंढरपूर विठ्ठल मंदिर, अक्कलकोट, औंदुबरचं दत्त मंदिर, नरसोबाची वाडी, जोतिबा देवस्थान, कोल्हापूरची अंबाबाई, कुणकेश्वर मंदिर आणि पत्रादेवी ही देवस्थानं या महामार्गाने जोडली जाणार आहेत..