असा व्हिडिओ कधी पाहिला नसेल; खेळण्यातल्या पंख्याप्रमाणे पवनचक्की कोसळली
बीडमध्ये पवनचक्की कोसळतानाचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Beed Local News : खेळण्यातल्या पंख्याप्रमाणे पवनचक्की कोसळली आहे. बीडमध्ये ही थराराक घटना घडली आहे. पवनचक्की कोसळतानाचे दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सध्या शेतीमध्ये मशागतीची काम चालू आहेत. यामुळे शेतकरी आपल्या शेतामध्ये मशागतीचे काम करत असताना अचानक पवनचक्की कोसळल्याने मोठा आवाज आला. यामुळे शेतकरी भयभित झाले आणि जोरात आरडाओरड केला.
बीड च्या गेवराई तालुक्यातील पालख्या डोंगराजवळ असलेल्या टेंभी तांडा परीसरातील पनामा कंपनीची 24 नंबरची पवनचक्की कोसळून नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.. वादळी वाऱ्यामुळे ही पवनचक्की कोसळली आहे. सुदैवाने यावेळी या पवनचक्कीच्या खाली कोणीही नव्हते म्हणून दुर्घटना घडली नाही. पण अवाढव्य वजनाची पवनचक्की जमिनीवर पडतात मोठा आवाज झाला त्यामुळे या परिसरामध्ये मोठी दहशत पसरली.
सध्या शेतीमध्ये मशागतीची काम चालू आहेत. या घटनेने शिंदखेड परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असून ही पवनचक्की कशामुळे कोसळली याचं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परिसरामध्ये जवळपास 50 होना अधिक पवन चक्की उभारण्यात आल्या आहेत. मात्र, ही पवनचक्की का कोसळली याचं कारण अद्याप पर्यंत स्पष्ट झालं नसलं तरी सध्या पावसाचे दिवस असल्याने आणि सुसाट वाऱ्याचा वेग असल्याने ही पवनचक्की पडल्याचे येथील शेतकरी सांगत आहेत. मात्र, या पवनचक्कीमुळे विद्युत तारा देखील मोठ्या प्रमाणात कोसळल्या आहेत. पवनचक्की कोसळताना मोठा आवाज झाल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन होणारा अनर्थ टाळावा अशी येथील शेतकऱ्यांकडून भावना व्यक्त केल्या जात आहेत.