मुंबई : Wine in Maharashtra: दुकानामधून आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आता दुकानातून आणि सुपर मार्केटमधून वाईन मिळताना दिसणार आहे. यावरुन विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. मद्यराष्ट्र करुन ठेवलं आहे, अशी टीका केली आहे. आता भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांचे ‘ झिंग झिंग झिंगाट ‘ झालेत, असे पडळकर म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जनाब संजय राऊत हे  विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी की ते परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकी बाबत खुलासा करतील. त्यामुळेच राऊतांचं ‘ झिंग झिंग झिंगाट ‘ झाले आहे. जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागले नाही. ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावे लागले. गावच्या गाव अंधारात लोटली गेली. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला, अशी टीका पडळकर म्हणाले



जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर हे नमूद करणार का?की तुम्ही महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाईनलाच विक्रीची परवानगी असणार. परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना नाही.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद  पवार यांच्या नावाचा वापर करुन आपण विक्रीचं समर्थन करताय. मला खात्री आहे की जे पवारांनी आयुष्यात खूप सोसलं आहे आणि त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या तरुण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत, असे ते म्हणाले.