`डोळा मारणे हा विनयभंगच`; मुंबईतील कोर्टाचा निर्णय! आरोपीला सुनावलेली शिक्षा धक्कादायक
Mumbai Mazgaon District Megistrate: या प्रकरणामधील आरोपीचं वय 20 वर्ष इतकं आहे. सदर प्रकरणाची सुनावणी तब्बल 2 वर्ष सुरु होती. अखेर या प्रकरणाचा निकाल लागला असून आरोपीला दोषी ठरवण्यात आलं आहे.
Mumbai Mazgaon District Megistrate: कोलकात्यामधील आर. जी. कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलमध्ये 31 वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याच्या प्रकरणामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. त्यातच दुसरीकडे बदलापूरमधील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्रामध्येही संतापाची लाट दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून राज्याबरोबरच देशभरातून वेगवेगळ्या भागांमधून लैंगिक अत्याचार तसेच विनयभंगाच्या बातम्या समोर येत आहेत. असं असतानाच मुंबईमधील माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने एक महत्तपूर्ण निर्णय दिला आहे. महिलेला पाहून डोळा मारणे हा विनयभंगच असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. (दिवसभराचे लाइव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा)
नेमकं घडलं काय?
सदर प्रकरण 2022 मधील आहे. 5 एप्रिल रोजी 20 वर्षीय तरुणाने एका महिलेचा हात पकडून तिला डोळा मारला होता. हे कृत्य म्हणजे महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न करणारं असल्याचं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं. भायखळ्यामधील आरोपीचं नाव मोहम्मद कैफ मोहम्मद शोहराब फरीक असं आहे. डॉकयार्ड रेल्वे स्टेशनसमोरील दुकानामध्ये तो कामाला होता. तक्रार करणाऱ्या महिलेने या दुकानामधून सामान खरेदी केलं. या सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी आरोपी महिलेच्या घरी गेला होता. सामान घरात ठेवल्यानंतर ग्राहक महिलेने पावती मागितली. त्यावेळस पावती देताना आरोपीने महिलेचा हात पकडला आणि तिला डोळा मारला. महिला जोरात किंकाळली आणि तिने आरडाओरड सुरु केला. आरोपी घाबरुन पळून गेला.
नक्की वाचा >> Kolkata Rape: आरोपीच्या मांडीवर जखमा! रेड लाईट एरियात S*x का टाळला? तपासात म्हणाला, 'माझ्याकडे...'
तक्रार दाखल आणि अटक
महिलेने पोलीस स्थानकामध्ये जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर भायखळा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. हा खटला तब्बल 2 वर्ष चालला. या प्रकरणामध्ये न्याय दंडाधिकारी आरती कुलकर्णींनी आरोपीला दोषी ठरवलं आहे.
नक्की वाचा >> Kolkata Rape Case: रात्री 2.45 ला पीडितेने केलेल्या रिप्लायमुळे गूढ वाढलं! महत्त्वाचा पुरावा
काय शिक्षा ठोठावली
आरोपीचं वय आणि गुन्ह्याचा स्वरुप लक्षात घेत न्याय दंडाधिकाऱ्यांनी त्याला कारवासाची शिक्षा न सुनावणात आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. आरोपीने पीडितेला 2 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. या महिलेला तरुणाच्या कृत्यामुळे मनस्ताप झाल्याचं निरिक्षण कोर्टाने नोंदवलं. आर्थिक दंड भरल्यानंतर या तरुणाला समज देऊन सोडण्यात आलं आहे.