Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स
27 Aug 2024, 22:14 वाजता
सिंधुदुर्गमधल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यावरुन महाविकास आघाडी बुधवारी मालवमध्ये आंदोलन करणार आहे. आदित्य ठाकरे हे सुद्धा मालवणला जाणार असून आंदोलनात सहभागी होणार आहेत.
27 Aug 2024, 21:19 वाजता
सिंधुदुर्गमधल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. यावरुन विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्विट केलं असून हे ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे. आपल्या पोस्टमध्ये अनिल देशमुख यांनी म्हटलंय 'ताशी 45 कि.मी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कोकणात नारळाच्या झाडावरून नारळही लवकर पडत नाहीत, पण भ्रष्टाचार मात्र उघडा पडला'
27 Aug 2024, 20:06 वाजता
दहीहंडी उत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दहीहंडीला भेट दिली.. यंदा विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार असल्याचं विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय... तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही वरळीतील परिवर्तन दहीहंडी उत्सवाला भेट दिली. यावेळी गोविंदा पथकानं अफजलखानाच्या वधाचा अप्रतिम प्रसंग साकारला होता. त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया देत अफझलरुपी शक्तीचा कोथळा बाहेर काढू, असं वक्तव्य केलं..
27 Aug 2024, 18:48 वाजता
अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार पक्ष आणि अधिकृत प्रवक्ते सूरज चव्हाण यांना Defamation Notice बजावली आहे. ‘सुपारीबाज बाई’ ‘रीचार्ज वर चालणारी बाई’ त्या ब्लॅकमेलर आहेत का असे आरोप अंजली दमानिया यांच्यावर करण्यात आले होते. हे अतिशय गंभीर, बेछूट, गलिच्छ आणि खालच्या दर्ज्याचे आरोप एका सुसंस्कृत, सिध्दांतवादी व्यक्ती बद्दल केलेत ह्याची अद्दल तुम्हाला भोगावी लागेल, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
27 Aug 2024, 18:03 वाजता
बदलापूर प्रकरणात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन सप्टेंबरला प्रतीज्ञापत्र सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. आढाव्यासाठी समिती नेमण्याच्या सूचनाही हायकोर्टाने राज्य सरकारला केल्या आहेत.
27 Aug 2024, 18:03 वाजता
बदलापूर प्रकरणात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन सप्टेंबरला प्रतीज्ञापत्र सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. आढाव्यासाठी समिती नेमण्याच्या सूचनाही हायकोर्टाने राज्य सरकारला केल्या आहेत.
27 Aug 2024, 17:57 वाजता
बदलापूर प्रकरणात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन सप्टेंबरला प्रतीज्ञापत्र सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. आढाव्यासाठी समिती नेमण्याच्या सूचनाही हायकोर्टाने राज्य सरकारला केल्या आहेत.
27 Aug 2024, 16:21 वाजता
जय जवान दहीहंडी पथकानंतर नऊ थर लावण्याचा विक्रम ठाण्यातील खोपटचा राजा पथकाने केला आहे. कॅसल मिल सर्कल येथील शारदा प्रतिष्ठानमार्फत आयोजित दहीहंडी उत्सवात हा विक्रम करून खोपटचा राजा गोविंदा पथक 9 थर लावणार ठाण्यातील पहिला गोविंदा पथक ठरला आहे. तर हा विक्रम मुख्यमंत्री यांच्या समोर झालाय ....
27 Aug 2024, 15:21 वाजता
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात नदीच्या पुरात चार जण वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. साक्री तालुक्यातल्या आष्टाने गावातील ही घटना आहे. दोन महिलांसह दोन पुरुष कान नदीच्या पुरात वाहून गेले. यापैकी तिघांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. एक महिला मात्र बेपत्ता असून आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस बेपत्ता महिलेचा शोध घेत आहेत.
27 Aug 2024, 14:39 वाजता
शिवरायांचा पुतळा कोसळला : फॉरेन्सिकची टीम मालवणमध्ये दाखल
मालवण राजकोट येथे फॉरेन्सिक इन्वेस्टीगेशनची टीम दाखल झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची करणार पाहणी. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी,नौदलाचे अधिकारी व सिंधुदुर्ग फॉरेन्सिक इनव्हेस्टीगेशन टीम, पोलीस एकत्र पाहणी करणार आहेत.