पंढरपूर : राज्यात थंडीमुळे आता सगळंयाना हुडहुडी जाणवत आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण ऊबदार कपडे वापरतो. पंढरपुरातही सावळया विठुरायाला थंडी वाजू नये म्हणू वेगळा पोशाख आहे. कार्तिकी एकादशी सोहळ्यात विठोबा भाविकांना अखंड दर्शन देण्यासाठी उभा असतो. त्यामुळे देवाचा थकवा जाण्यासाठी प्रक्षाळ पूजा करतात. प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून विठोबाला थंडी वाजू नये म्हणून वेगळ्या प्रकारचा पोशाख असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहाटेच्या महापूजेवेळी देवाला आज निळे आणि लाल रंगाचे पितांबर तर मखमली रंगाची अंगी परिधान केली. थंडी वाजू नये म्हणून विठोबाच्या कानावर कानपट्टी बांधतात यासाठी एक विशिष्ट पद्धत आहे. पोशाख परिधान केलेल्या देवाच्या अंगावर नंतर गुलाबी रंगाची ऊबदार शाल ठेवतात. रात्री शेजारती नंतरही देवास ऊबदार पोशाख असतो. आपल्या प्रमाणेच देवाची काळजी घेण्याची परंपरा पंढरपुरात गेली अठ्ठावीस युगे आहे.


साधारणतः वसंत पंचमी पर्यंत देवाला असा पोशाख असतो. यानंतर वसंत पंचमी ते रंगपचमी देवास फक्त शुभ्र रंगाचा पोशाख असतो. तर उन्हाळ्यात देवाला उषमा जाणवू नये यासाठी चंदन उटी पूजा करतात.