नाशिक : राज्यभरात ठिकठिकाणच्या टोल नाक्यांवर होणारे हाणामारीचे दृश्य हल्ली नेहमीचेच बनले आहे. यात बहुतांश ठिकाणी सर्वसामान्य नागरिक जे कायद्याच्या अज्ञानातून हा प्रकार करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र पुणे नाशिक महामार्गावरील चाळकवाडी टोल नाक्यावर कायद्याचं रक्षण करणाऱ्या हातांनीच हा दुर्दैवी प्रकार घडविला आहे. केवळ यावरच हा संपूर्ण प्रकार थांबला नाही तर एका ACB च्या महिला पोलीस अधिकाऱ्याने या टोल कर्मचाऱ्यांवर जे या ठिकाणी उपस्थितही नव्हते त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. काय आहे हे सगळं प्रकरण पाहुयात.. 


काय घडलं नेमकं?


पुणे नाशिक महामार्गावरचा हा आहे चाळकवाडी टोल नाका...खरं तर या महामार्गाच संपूर्ण काम होण्याआधीच हा टोल नाका सुरु करण्यात आल्याने सुरुवातीपासूनच हा टोलनाका चर्चेत राहिला आहे. त्यानंतर या टोल नाक्यावर सततच वाहनचालकांचे आणि टोल कर्मचाऱ्यांचे वाद होत राहिले. आता नुकतेच पुणे अँन्टी करप्शन बिरोच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र मागितल्याचा रागातून इथल्या टोल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली यात त्याचे नाकाचे हाड फ्रॅक्चर झाल्याने या कर्मचाऱ्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.


रक्षकचं झाले भक्षक


ज्यांनी कायद्याचं रक्षण करायला हवं त्यांनीच कायदा हातात घेतल्याने हे प्रकरण गंभीर बनले आहे. खरं तर या टोल कर्मचाऱ्याने त्याच काम केले. त्याचा काही दोष नसताना त्याला हि शिक्षा भोगावी लागते आहे. राज्यभरातल्या टोल नाक्यांवरच्या कर्मचाऱ्यांचं हेच दुःख आहे. जर या ACB च्या अधिकाऱ्यांना या कर्मचाऱ्याने अटकाव केला होता तर ते कायदेशीर मार्गाने दाद मागू शकले असते. मात्र त्यांनी अशाप्रकारे कायदा हातात घेणं कितपत योग्य आहे. याबाबत आळेफाटा पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाला आहे.


व्यवस्थेवर प्रक्रिया


यात स्थानिक लाचलुचपत गुन्हे प्रतिबंधक विभागातील महिला पोलीस अधिकाऱ्याने संबंधित टोल कर्मचाऱ्यांवर विनयभंगाचे गुन्हा दाखल केल्याने गुन्हा दाखल होण्याच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तूर्त तरी सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असं ब्रीदवाक्य असणाऱ्या पोलिसांच्या वागण्यावर समाजातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.