ज्या डॉक्टरांनी कोरोनातून बरं केलं, त्या डॉक्टरांना महिलेची खंडणीसाठी धमकी
खंडणी दिली नाही तर मुलांचं अपहरण करण्याची धमकी दिली. एखाद्या दहशतवाद्याप्रमाणे या बाईनं धमकीचं पत्र लिहिलं.
अमर काणे, नागपूर : ज्या डॉक्टरांनी कोरोनातून बरं केलं, त्या डॉक्टरांनाच धमकी देऊन खंडणी मागणा-या एका महिलेला अटक करण्यात आलीय. एखाद्या क्राईम वेबसीरिजमध्ये शोभावी अशी ही फिल्मी कथा आहे.
कोरोना पेशंट झाली खंडणीखोर
सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. शीतल इटनकर असं या महिलेचं नाव आहे. नागपुरातल्या डॉ तुषार पांडे आणि पत्नी डॉक्टर राजश्री पांडे यांच्याकडे तब्बल १ कोटीची खंडणी या महिलेने मागितली. खंडणी दिली नाही तर मुलांचं अपहरण करण्याची धमकी दिली. एखाद्या दहशतवाद्याप्रमाणे या बाईनं धमकीचं पत्र लिहिलं.
महत्त्वाचं म्हणजे शीतल आणि तिच्या नव-यानं याच डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये सप्टेंबर महिन्यात कोरोनावर उपचार घेतले होते.
खंडणी मागणारी शीतल इटनकर स्वतः फॅशन डिझायनर आहे. पती उच्चपदस्थ अधिकारी आणि उत्तम पगार आहे.. शीतलला वेबसीरिज पाहण्याचा नाद आहे. झटपट पैसा कमावण्यासाठी तिनं हा खंडणीचा उद्योग केला.
शीतलला मोठ्ठी बिझनेस वुमन व्हायचं होतं, स्वतःचं बुटीक उघडायचं होतं. त्यासाठी या अशा मार्गानं पैसा गोळा करणं फारच धक्कादायक आहे. नागपुरात या प्रकारानं खळबळ उडालीय.