नागपूर : पत्नीसमोर अश्लिल बोलतो म्हणून संतापलेल्या एका चहा विक्रेत्याने चक्क एका हमालाची जाळून हत्या केली. ही घटना चंद्रपूर येथील गंजवॉर्ड भाजीमार्केट येथे रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.


गजबजलेल्या परिसरात घडली घटना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राप्त माहितीनुसार, देवीदास धामनगे (वय 42) असे चहा विक्रेत्याचे नाव आहे. तर, भोजराज पिल्लेकर (वय 40) असे मृतकाचे नाव आहे. गंजवॉर्ड हा परिसर हा भाजीबाजाराचा असून, येथे नेमहीच असंख्य लोकांची वर्दळ असते. याच ठिकाणी देवीदास धामनगे याचा चहाचे आणि खाद्यपदार्थांचे दूकान आहे.


बोलताना करायचा अश्लिल भाषेचा वापर


दरम्यान, भोजराज पिल्लेकर हा भाजीबाजारात हमालीचे काम करायचा. परिसरात त्याला कांचा नावाने ओळखले जात असे. त्यामुळे धामनगे आणि पिल्लेकर (कांचा) यांची जूनी ओळख होती. या ओळखीतून धामनगे यांच्या दुकानावर येऊन तो नेहमीच चहा पीत होता. मात्र, आपल्या पत्नीसोमरो बोलताना तो अश्लिल भाषेचा वापर करतो. त्यामुळे धामनगे चिडत असे. यातूनच पिल्लेकर याचा कायमचा काटा काढण्याचा विचार धामनगे याने केला.


आरोपीने केले पोलिसांकडे आत्मसमर्पण


शुक्रवारी रात्रीच्या सुमारास धामनगे दुकान बंद करीत असताना भोजराज तेथे आला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. रागाच्या भरात धामनगे याने पिल्लेकरच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, अश्लिल बोलण्यातून हत्या केल्याचे धामनगे याचे म्हणने असले तरी, या घटनेला पैशाच्या वादाची किनार असल्याची चर्चा आहे. घटनेनंतर धामनगे याने शहर पोलिसांकडे आत्मसमर्पण केले.